गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून फसवणूक होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकांना तर या फसवणूकीमुळे लाख – दीड लाखाचा फटका बसला आहे. व्हिडीयो लाईक करा आणि पैसे मिळवा, घरबसल्या लाखो कमवा अशा आशयाचे मेसेजेस युजर्सना सतत येत असतात. एका विश्वसनीय रिपोर्टनुसार भारतातील व्हॉट्सअॅप युजर्सना प्रत्येक दिवशी एक दोन नव्हे तर तब्बल १७ अनोळखी नंबरवरून कॉल्स येतात. अशा परिस्थितीत युजर्सची फसवणूक होणे, त्यांचे अकाउंट हॅक होणे या सारख्या सायबर क्राईमशी संबंधिक समस्या भीषण स्वरूप धारण करतात. अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पुढील गोष्टींचे आवर्जून पालन केले पाहिजे
१. प्रायव्हसी सेटिंग
फोटो, स्टेटस, लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस, अबाऊट स्टेटस या खासगी गोष्टी आहेत. या गोष्टी अनोळखी व्यक्ती पाहू शकते की नाही, सर्व कॉन्टक्ट्स पाहू शकतात की फक्त काही निवडक माणसेच पाहू शकतात याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कंपनीने युजर्सला दिले आहे. शक्यतो अनोळखी व्यक्तींपासून या गोष्टी लपवाव्यात.
२. ग्रुप प्रायव्हसी सेटिंग
प्रत्येक जण किमान दहा – बारा ग्रुप्सला तरी अॅड असतोच. पूर्वी समोरच्याला नंबर मिळाला तर कोणीही कोणालाही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करू शकायचे. आता तसे चित्र राहिलेले नाही. अॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन अनोळखी व्यक्ती तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करू शकते की नाही ते निश्चित करता येते.
(हेही वाचा – गुगल बार्ड VS चॅटजीपीटी; बार्ड का ठरतोय सरस?)
३. लिंक डिव्हाइस तपासा
कार्यालयीन किंवा वैयक्तिक कामांमुळे युजर्स अनेकदा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून व्हॉट्सअॅपवर लॉगिंन करतात. काम झाल्यावर घाई घाईत लॉग आउट करायचे राहून जाते. या सवयीमुळे व्हॉट्सअॅप हॅक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लिंक डिव्हाइस या पर्यायावर जाऊन तुमचे खाते इतर कोणत्या सिस्टीममध्ये लॉग इन आहे की नाही याची खातरजमा करून घ्या.
४. टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
५. अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज आला तर तो त्वरीत ब्लॉक करून टाकावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community