हृदयविकार टाळण्यासाठी ‘हे’ कराच, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

308
हृदयविकार टाळण्यासाठी 'हे' कराच, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल
हृदयविकार टाळण्यासाठी 'हे' कराच, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल

बदलतल्या जीवनशैलीमुळे नानाविध रोग लवकर होण्याचे आणि ते दीर्घकाळ टिकण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यात मधुमेह, लठ्ठपणा, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा समावेश होतो. दरवर्षी सुमारे १७.९ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू हृदय व रक्तवाहिन्यांच्या रोगांमुळे होतो. यातील पाच पैकी चार रुग्णांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे आणि स्ट्रोकमुळे होतात. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे दिवसेंदिवस कठीण आणि आवश्यक होत चालले आहे.

हृदय विकार टाळण्यासाठी हे करा 

वजन

ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना वजन मर्यादेत असणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकार होण्याची जास्त शक्यता असते. जास्त वजनामुळे हृदय तसेच रक्त वाहिन्यांवरचा ताण वाढतो. म्हणून वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागरूकतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आहार

हिरव्या पालेपाज्या, ताजी फळे, मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात आवर्जून समावेश करा. तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ आहरात योग्य प्रमाणात असू दे. मीठ आणि साखरेवर नियंत्रण ठेवा. वारंवार बाहेरचे खाणे टाळावे.

व्यायाम

व्यायामाचे नाव काढल्यावर अनेकांच्या कपाळावर लगेच आठ्यांचे जाळे उभे होते. मात्र निरोगी जीवानासाठी व्यायाम गरजेचा आहे. त्यासाठी व्यायामशाळेतच गेले पाहिजे असे काही नाही. घराच्या आजुबाजूला दिवसातील काही मिनिटे चालण्यापासून सुरुवात करू शकता. नियमित व्यायाम केल्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल सारख्या समस्यांपासून दूर राहता येते.

(हेही वाचा –  Blood Pressure : सतत फोनवर बोलता? जरा दमानं! होईल रक्तदाबाचा त्रास)

धूम्रपान सोडा

धूम्रपानाचे तोटे सर्वज्ञात आहेत. तरीही मोठ्या प्रमाणात धूम्रपान केले जाते. सिगारेट आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देते. या व्यतिरिक्त धूम्रपानामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

नियमित तपासणी

योग्य वेळी रोगाचे निदान होणे अत्यावश्यक आहे. आजार गंभीर होण्याआधी औषधे सुरू झाली तर पुढे होणार आर्थिक आणि शारीरिक त्रास थांबवता येतो. यासाठी फक्त एक साधी गोष्ट नियमितपणे करावी लागेल. किमान वर्षातून एकदा किंवा दोनदा संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतली पाहीजे. शरीरात होणारे आंतरीक बदल सर्वसामान्य माणसाला ओळखता येणार नाहीत. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.