‘या’ टिप्स फॉलो करा…अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होऊ शकते हॅक!

जगभरातील लाखो युजर्स मेसेजिंग अ‍ॅपसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. दैनंदिन जीवनात आपण बहुतेक गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकमेकांना पाठवतो. फोटो, Voice Recording, ऑडिओ, फाइल्स शेअर करण्यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. अनेक हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून युजर्सला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तसेच काही लोक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोट्या माहितीचा सुद्धा प्रसार करतात अशावेळी तुम्ही खालील टिप्स फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच आपले व्हॉट्सअ‍ॅप अधिक सुरक्षित ठेऊ शकता.

( हेही वाचा : CSMT Railway Station : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे १३५ वर्षात ४ वेळा बदलले नाव)

व्हॉट्सअ‍ॅप अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल? 

  • व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हेट चॅटमध्ये (Private Chat) डिसपिअरिंग मेसेज नावाचे फिचर असते. यामुळे युजर्स विशिष्ट कालावधीकरिता मेसेज स्टोअर करू शकता यानंतर तुमचे मेसेज डिसपिअर होतील. तसेच खासगी फोटो, व्हिडिओ पाठवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर व्ह्यू वन्स ( view once) ही सुविधा वापरू शकता.
  • व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा अधिक चांगली व सुरक्षित व्हावी याकरता व्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्सला कायमच नवनवीन फिचर्स देत असते यानुसार व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही अज्ञात व्यक्तींना ब्लॉक करू शकता. एखाद्याला त्रासदायक मेसेज केल्यास संबंधित व्यक्ती याची तक्रार करू शकते तसेच हे मेसेज रिपोर्ट देखील करता येतात.

  • व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्स Two step verification ही सुविधा ऑन ठेऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप सुरू केल्यावर किंवा रिसेट करताना हा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड असल्यास आपली माहिती सुरक्षित राहते. तुमच्या परवानगीशिवाय व्हॉट्सअ‍ॅप कोणीही वापरू नये यासाठी तुम्ही Two step verification हा पर्याय सुरू ठेऊ शकता. Setting मध्ये जाऊन युजर्स हा पर्याय ऑन करू शकतात.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले मेसेज न तपासता किंवा या मेसेजची खात्री न करता फॉरवर्ड करू नका. व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले फॉरवर्ड मेसेज अनेकदा चुकीचे असू शकतात. यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here