आता राज्यात हळूहळू थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. रात्रीच्या हवेत गारवा जाणवत असल्याने मुंबईकर खूश आहेत. वातावरणात गारवा असल्याने सर्वांनाचा दिलासा मिळाला आहे. परंतु बदलत्या ऋतुमानात आहारात सुद्धा बदल करणे गरजेचे आहे. थंडीमध्ये काहीजण वारंवार चहा-कॉफीसारख्या गरम पदार्थांचे सेवन करतात, यामुळे भविष्यात धोका निर्माण होऊ शकताे.
( हेही वाचा : Post Office Scheme : ९५ रुपये गुंतवा, १४ लाखांपर्यंत परतावा मिळवा! जाणून घ्या सरकारी जीवन विमा योजनेविषयी… )
आहारात काय खावे ?
- थंडीमध्ये प्रामुख्याने हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या भाज्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात यातून मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे मिळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच या काळात फळेही खाल्ली पाहिजेच. अक्रोड, बदाम या काळात खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे. उडीद, चणा, राजमा या कडधान्यांचा वापर जेवणात करावा. घशाला त्रास जाणावा तर कोमट पाणी प्यावे. संत्री, द्राक्षे या फळांमध्ये ‘क’ जीवनसत्व असते त्यामुळे हिवाळ्यात या फळांचे सेवन करावे.
- जेवणात तीळ, लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र अशा मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश करावा.
- गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरीसोबत लोणी किंवा तूप खावे.
हे करू नका
- थंडीत फ्रिजमधील पदार्थांचे सेवन करू नका. मुख्यत: थंडीत फ्रिजमध्ये ठेवलेल्या दह्याचे सेवन करू नका यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
- थंडीत थंड पेय पिणे टाळा, थंड दूधही पिऊ नका.
- या दिवसात प्रथिनेयुक्त आहार घ्यावा, ब्रेडचे प्रकार टाळावेत.
- बाहेरील तेलकट पदार्थांचे सेवन करू नये.