lifestyle : दह्यासोबत खाऊ नका ‘हे’ पदार्थ, शरीरावर होऊ शकतात परिणाम

236
lifestyle : दह्यासोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, शरीरावर होऊ शकतात परिणाम
lifestyle : दह्यासोबत खाऊ नका 'हे' पदार्थ, शरीरावर होऊ शकतात परिणाम

आहारात दह्याचा समावेश केल्याने कॅल्शियम, जीवनसत्त्वे, बी -12, बी-2, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. त्यामुळे दही पचायला सोपे असते.शारीरिक आरोग्य आणि सौंदर्य याकरिता आहारात दह्याचा समावेश करणे आवश्यक आहे, मात्र काही पदार्थांसोबत दही खाऊ नये, कारण यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.

दह्यातील बॅक्टेरिया अन्नपचनाच्या प्रक्रियेसाठी मदत करतात. यामुळे पोटातील उष्णताही कमी व्हायला मदत होते, मात्र काही पदार्थांसोबत दही खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

आंबा
आंबा आणि दही यांचे मिश्रण एकत्रितरित्या खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते.यामुळे त्वचेच्या समस्यांचा धोका वाढतो.पचनक्रियेत असंतुलित होते. हे दोन्ही पदार्थ एकत्रितरित्या खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ निर्माण होण्याची शक्यता असते.

दूध
दूध आणि दही यांचे एकत्रित सेवन केल्याने अतिसार, आम्लपित्त आणि गॅसेससारखे पचनाचे त्रास होऊ शकतात. यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ, शरीराला सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात,कारण दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबी तसेच प्रथिने जास्त असतात.

मासे
मासांहारी पदार्थांसह दही खाल्ल्याने पचनास त्रासदायक ठरू शकते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे माशांसोबत दही खाऊ नये.

तेलकट पदार्थ
दह्यासोबत तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने पचनक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

(हेही वाचा – Nana Patekar Twitter Post : नाना पाटेकरांनी शेअर केलेल्या पोस्टला सुधीर मुनगंटीवारांनी दिले स्पष्टीकरण)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.