कोरोना पुन्हा आलाय, हे नवीन सरबत प्या! 

सध्याच्या कोरोनाच्या संसर्गामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी औषधांचा मारा करण्यापेक्षा नैसर्गिक घटकांच्या आधारे सरबत बनवून त्यांचे सेवन करावे. 

85

मागील वर्षी सुरु झालेली कोरोना महामारी दुसऱ्या वर्षीही अतिशय भयंकर रूपाने वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी पडत असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी औषधांचा मारा करण्याऐवजी घरच्या घरी उपाय करता आले तर उत्तम आहे. त्यासाठी काही नैसर्गिक घटकांच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास हातभार लावता येऊ शकते. दिवसभरातील कामामुळे आलेला थकवा कमी करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी हा पर्याय उत्तम आहे.

हळद, आले आणि अॅपल सायडर व्हिनेगरचे सरबत  –  शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी उठून आले आणि त्यापासून तयार करण्यात आलेली पेय पिणे कधीही उत्तम. हळद आणि आल्यामध्ये असणारे काही गुण दिवसभर तुमच्या शरीरात असणारी रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवतात. हे पेय बनवण्यासाठी आल्याची पेस्ट, १ चमचा हळद, 1 चमचा अॅपल सायडर विनेगर आणि चवीनुसार मध या गोष्टींची गरज आहे.

(हेही वाचा : अजय देवगणसह सेलिब्रेटींचा महापालिकेला पुन्हा एकदा मदतीचा हात!)

कृती – हे पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आले आणि हळद टाकून 5 ते 10 मिनिटांसाठी हे मिश्रण उकळवून घ्या. त्यानंतर गॅस बंद करुन हे मिश्रण गाळून घ्या. हलकेसे थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध आणि अॅपल सायडर विनेगर मिसळून हे सरबत प्या.

ओवा, तुळस आणि काळ्या मिरीचे सरबत – हे सरबत बनवण्यासाठी अर्धा चमचा ओवा, 5-6 तुळशीची पाने, अर्धा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा मध या गोष्टींची गरज आहे.

कृती – या सरबतासाठी एक ग्लास पाणी घ्या. यामध्ये तुळशीची पाने, काळीमिरी पूड, ओवा टाकून हे मिश्रण 5 मिनिटांसाठी उकळून घ्या. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मध मिसळून हे पेय प्या. कफची समस्या सतावत असेल तर तुम्हाला यामुळे आराम मिळेल. पोटाच्या आरोग्यासाठीसुद्धा हे पेय लाभदायक आहे.

गुळवेल, लवंग आणि लिंबाचे सरबत – हे सरबत बनवण्यासाठी 5 लवंग, 6-7 तुळशीची पाने, 1 चमचा आले, 1 कप गुळवेलीचा रस, 2 चमचे लिंबाचा रस आणि चवीनुसार काळे मीठ या साहित्याची गरज आहे.

कृती – हे सरबत बनवण्यासाठी 1 कप पाणी 5 मिनिटे उकळवून त्यामध्ये 1 कप गुळवेलीचा रस मिसळा. चवीपुरते मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस त्यात मिसळा. त्याचवेळी या मिश्रणात लवंग आणि तुळशीची पाने ही घाला. थोड्या वेळाने मिश्रण थंड झाल्यावर ते प्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.