मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बस, रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर त्याचा नकारात्मक परिणाम पडतो आहे. प्रत्येत वर्षी साधारण ३० ते ३५ लाख प्रवासी बेस्टमधून प्रवास करतात. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी बेस्ट सतत काही ना काही प्रयत्न करत असते. काही वर्षांपूर्वी बेस्टने ‘चलो’ हे मोबईल अॅप लॉन्च केले होते. या अॅपच्या माध्यमातून तिकिट खरेदी करणे, बसचे लाईव्ह लॉकेशन ट्रक करणे यासारख्या गोष्टी करता येतात. चलोच्या मागोमाग बेस्टने एक कल्पक योजना राबवली आहे.
तुम्हीच व्हा रायडर
कमी अंतराच्या प्रवासासाठी मुंबईकर एकतर चालत जातात किंवा खासगी/सार्वजनिक वाहानाचा उपयोग करतात. यातला पहिला पर्याय वेळखाऊ असतो तर दुसरा पर्याय खर्चिक ठरू शकतो. यावर बेस्टने मधला रस्ता काढला आहे. परवडणाऱ्या दरात बेस्ट दुचाकी देईल, तुम्ही ती स्वत: चालवून इच्छीत स्थळी घेऊन पोहोचू शकता. या सुविधेचे नामकरण वोगो असे ठेवण्यात आले आहे.
(हेही वाचा PM Modi : पॅसिफिक देशांशी भारताचे संबंध सुधारण्यासाठी मोदींचे प्रयत्न)
या इलेक्ट्रिक दुचाकीचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून वोगो हे अॅप डाऊनलोड करा. अॅपला तुमचा मोबाईल नंबर आणि लोकेशन दिल्याशिवाय रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही. प्रवास सुरू करण्यासाठी वोगोच्या खात्यात १०० रूपये जमा करावे लागतील.
दुचाकी कुठे आहे, तिचा नंबर काय आहे, तिची चार्जिंग किती आहे या सगळ्या गोष्टी वोगोच्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून समजेल. जर वोगो फुल चार्ज असेल तर सहज ४० – ४५ किलोमीटरचे अंतर कापू शकता येईल.
आधी हे हवं
- परवडणाऱ्या दरात मुंबईत प्रवास करण्यासाठी आधी हे करावे लागेल
- वोगो चालवण्यासाठी ड्रायव्हींग लायसन्सची एक प्रत अॅपवर अपलोड करावी लागेल
- एक सेल्फी काढून तो अपलोड करावा लागेल