- ऋजुता लुकतुके
फोर्स गुरखा फाईव्ह डोअर ही एसयुव्ही गाडी आता भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे. कंपनीने अलीकडेच ही गाडी भारतात लाँच केली आहे. फोर्स कंपनीच्या गुरखा या सर्वाधिक लोकप्रिय गाडीचा हा फाईव्ह डोअर प्रकार असणार आहे. चालकाखेरीज इतर सहा जण या गाडीने एकावेळी प्रवास करू शकतील. (Force Gurkha 5 Door)
२,५९६ सीसी क्षमतेचं डिझेलवर चालणारं इंजिन या गाडीत आहे. सध्याच्या थ्री जोअर गाडीचंच इंजिन या मोठ्या गाडीतही असेल. आणि गाडीला ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. गाडीच्या इंजिनाची क्षमता ९० पीएस आणि २५० एनएम अशी आहे. या गाडीत सात इंचांचा डिस्प्ले असेल. पहिल्या तसंच दुसऱ्या रांगेत पॉवर विंडो देण्यात आले आहेत. तसंच गाडीत मॅन्युअल एसी व्हेंट देण्यात आले आहेत. (Force Gurkha 5 Door)
What did you think 4x4x4 meant? Wrong answers only!
Watch the full review of the Gurkha 5-Door on our YouTube channel now: https://t.co/SztmIDUTpo#PowerDrift #PDArmy #ForceGurkha #Gurkha5Door #ForceMotors #7Seater pic.twitter.com/OObfbB5h9k
— PowerDrift (@PowerDrift) May 1, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: दिल्ली कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपामध्ये प्रवेश, ‘या’ ४ नेत्यांचाही प्रवेश)
याचबरोबरच या एसयुव्हीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दोन एअरबॅग देण्यात आल्या आहेत. तसंच रिव्हर्सिंग कॅमेरा आणि रेअर पार्किंग सेन्सरही गाडीत आहेत. मारुती जिमनी तसंच महिंद्रा थार या गाडींशी फोर्स गुरखा गाडीची स्पर्धा असेल. फोर्स गुरखा गाडीची किंमत असेल १६.७५ लाख रुपये इतकी आहे. आणि २९ एप्रिलपासून या गाडीचं बुकिंग सुरू झालं आहे. तुम्ही अगदी २५ हजार रुपये देऊन गाडीचं बुकिंग करू शकता. (Force Gurkha 5 Door)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community