नुकताच व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. प्रेमाचा हा दिवस काही लोक उथळपणे साजरा करत असले तरी काही लोक मात्र आपल्या कुटुंबाला वेळ देतात. आपल्या प्रियजनांसाठी वेळ घालवतात. मग आई असो, मुलं असो किंवा पत्नी असो…
( हेही वाचा : ९० कंटेनर घेऊन निघालेली मालगाडी झाली बेपत्ता! रेल्वे प्रशासनात खळबळ, १३ दिवसांनी अशी पोहोचली मुंबईत )
बर्याचदा नवरा आणि बायकोवर अनेक विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात बायकोला घाबरणारा नवरा हे सामान्य कथानक आहे. बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवला नाही तर बायको कशी रागावते आणि मग तिची मनधरणी करायला नवर्याची कशी तारांबळ उडते यावर अनेक विनोद प्रसारित होत असतात. पण जगाच्या पाठीवर एक देश असा आहे, जिथे बायकोचा वाढदिवस विसरणे हा खूप मोठा गुन्हा ठरतो.
या देशाचं नाव आहे समोआ. समोआ हा अतिशय सुंदर देश आहे. दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील हा सुंदर देश. या देशाला न्यूझीलंडपासून १९६२ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. या देशात पती-पत्नीबाबतचा कायदा अगदीच विचित्र आहे. बायकोचा वाढदिवस विसरणे हा पुरुषांना जडलेला एक प्रमुख आजार आहे आणि बायकोला नवर्याचा हाच गुण आवडत नाही. पण ही इतर देशात जरी साधी आणि सामान्य बाब असली तरी समोआ या देशात हा गुन्हा मानला जातो.
जर नवरा पहिल्यांदा आपल्या बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याला चेतावणी देण्यात येते. परंतु दुसर्यांदा अशी चूक झली तर मात्र या देशातला कायदा कठोर पावले उचलतो. नवर्याकडून अशी चूक झाल्यास त्यास गुन्हा मानला जातो आणि नवर्याच्या विरोधात खटला चालवला जातो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या सामान्य चुकीसाठी पत्नीची मनधरणी करता येत नाही आणि नवर्याला ५ वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.
विचार करुन पाहा, तुम्ही तुमच्या पत्नीचा वाढदिवस विसरलात आणि तुम्हाला दंड म्हणून पैसे तर भरावे लागतातच. परंतु ५ वर्षांची शिक्षा देखील होते. आपल्या असा विचारही केला जाऊ शकणार नाही. मात्र या देशात हा कठोर कायदा आहे. आणि विशेष बाब म्हणजे महिलेने याबाबत तक्रार केली तर पोलिस ही तक्रार खूप गांभीर्याने घेतात. या कायद्याविषयी जनजागृती सुद्धा निर्माण केली जाते. हा छोटासा देश आहे. म्हटलं तर हा कायदा अगदी विचित्र आणि मूर्खासारखा आहे. पण विचार करुन पाहा, एकीकडे इतर देशात महिलांवर अत्याचार होत असतात आणि या लहानशा देशात मात्र महिलांचं मन समजून घेण्यासाठी कायदा अस्तित्वात आहे. मग विचित्र कोण आहे?
Join Our WhatsApp Community