कल्याण इथलं फोर्टिस हॉस्पिटल हे सर्वोत्कृष्ट मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांपैकी एक आहे. या हॉस्पिटलमध्ये ७५ बेड्स उपलब्ध आहेत. ३१,००० चौरस फुटांच्या क्षेत्रफळात वसलेल्या या हॉस्पिटलमध्ये कित्येक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसंच या हॉस्पिटलमध्ये अत्यंत अनुभवी आणि निपुण डॉक्टर्सची एक टीम आहे. ही टीम हॉस्पिटलमध्ये असलेल्या रूग्णांसाठी सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सुविधा प्रदान करण्यासाठी नवीनतम मेडिकल टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने आपली सर्वोत्तम सेवा पुरवतात. (fortis hospital kalyan mumbai)
फोर्टिस हॉस्पिटल हे ठाणे जिल्ह्यातलं असं पहिलं हॉस्पिटल आहे, ज्याला नॅशनल ऍक्रिडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स म्हणजेच NABH यांच्याकडून २०१३ साली मान्यता देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त NABH कडून चार वेळा मान्यता मिळालेलं कल्याण विभागातलं हे एकमेव हॉस्पिटल आहे. (fortis hospital kalyan mumbai)
(हेही वाचा – मनोरा, मॅजेस्टीक आमदार निवास आणि अजिंठा बंगल्याचे काम वेळेत पूर्ण करा; सभापती Prof. Ram Shinde यांचे निर्देश)
कल्याण इथल्या फोर्टिस हॉस्पिटलचा आढावा
कल्याण इथलं फोर्टिस हॉस्पिटल हे ठाण्यात असलेलं एक अत्यंत प्रतिष्ठित मल्टीस्पेशालिटी केअर हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवल्या जातात. त्यांत कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि आपत्कालीन सेवा समाविष्ट आहेत.
या हॉस्पिटलची स्थापना कल्याण येथे २००७ साली झाली. तेव्हापासूनच फोर्टिस हॉस्पिटलमध्ये प्रत्येक व्यक्तीशी विश्वासार्ह संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केलं जातं. आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रोटोकॉल राखून समाजाच्या वैविध्यपूर्ण वैद्यकीय गरजा पूर्ण करणं हे या रुग्णालयाचं उद्दिष्ट आहे. (fortis hospital kalyan mumbai)
कल्याण इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नाविन्यपूर्ण आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानावर भर दिली जाते. या हॉस्पिटलमध्ये प्रगत ICU आणि कार्यक्षम २४/७ इमर्जन्सी, तसंच ट्रॉमा केअर युनिट देखील आहे.
(हेही वाचा – Sundar narayan mandir : भव्य दिव्य आहे नाशिकमधलं सुंदरनारायण मंदिर! या मंदिरात कोणते दैवत विराजमान आहेत?)
हॉस्पिटलमधल्या स्पेशॅलिटी
हृदय शस्त्रक्रिया : कल्याण इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये प्रगत हृदय शस्त्रक्रिया आणि उपचार प्रदान करण्यात येतात. रुग्णांना उच्च कुशल तज्ञांकडून उपचार दिले जातात.
ऑन्कोलॉजी : या हॉस्पिटलचा प्रख्यात ऑन्कोलॉजी विभाग सर्वसमावेशक आहे. इथे कॅन्सरच्या उपचारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी वैयक्तिक उपचार योजना पुरवली जाते.
ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट : या हॉस्पिटलची तज्ज्ञ ऑर्थोपेडिक टीम प्रगत उपचार प्रक्रिया करण्यामध्ये कुशल आहे. ही टीम रुग्णांना त्यांच्या आयुष्यातली गतिशीलता परत मिळवण्यासाठी, तसंच त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत करते.
यूरोलॉजी : फोर्टिस हॉस्पिटलचा यूरोलॉजी विभागामध्ये विविध प्रकारच्या यूरोलॉजिकल आजारांवर प्रगत तंत्रज्ञानानुसार उपचार प्रदान केले जातात.
न्यूरोसर्जरी : कल्याण इथल्या फोर्टिस हॉस्पिटल मधली अत्यंत कुशल न्यूरोसर्जरी टीम ही प्रगत शल्यचिकित्सा तंत्र आणि तंत्रज्ञान वापरून जटिल न्यूरोलॉजिकल विकारांवर उपचार करते.
गॅस्ट्रो सायन्सेस : या हॉस्पिटलमध्ये सर्वसमावेशक असलेल्या गॅस्ट्रो सायन्सेस विभागामध्ये पाचनक्रियेच्या विकारांसाठी सर्वोत्तम उपचार प्रदान केले जातात.
क्रिटिकल केअर : कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिटमध्ये तज्ञांच्या एका टीमचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या अत्यंत गंभीर परिस्थितीत सर्वोच्च उपचार मिळतात.
बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी : विशेष बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरी टीम रुग्णांचे जीवन बदलून टाकणारे वजन कमी करण्याचे उपाय सुचवते. रुग्णांना वैयक्तिक उपचार योजनांसोबतच त्यांच्या आरोग्याचं लक्ष्य साध्य करण्यात मदत करते. (fortis hospital kalyan mumbai)
रक्त विकार : कल्याण इथल्या फोर्टिस हॉस्पिटलमधले अनुभवी तज्ज्ञ रुग्णांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रगत निदान आणि उपचार पद्धती वापरून वेगवेगळ्या रक्तविषयक विकारांवर उपचार करतात.
स्तन शस्त्रक्रिया : कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये स्तन शस्त्रक्रिया टीम ही स्तनाशी संबंधित आजारांवर सर्वसमावेशक उपचार प्रदान करते. तसंच रुग्णांना इथे उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपचार पर्याय आणि समर्थनही देते.
कॉस्मेटोलॉजी : या हॉस्पिटलचा कॉस्मेटोलॉजी विभाग विविध प्रकारचे सौंदर्यविषयक उपचार प्रदान करतो. ज्यामुळे रुग्णांना त्यांचं स्वरूप सुंदररित्या वाढवता येतं. तसंच इथे असलेल्या प्रोफेशनल आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्णांचा आत्मविश्वासही वाढतो. (fortis hospital kalyan mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community