ग्रँड मराठा फाऊंडेशनतर्फे अंध व्यक्तींसाठी मोफत धान्य वाटप

ठाण्यातील रामचंद्र नगर येथील मसल बील्ड फिटनेस जीममधील देखभाल करणारे कर्मचारी, ट्रेनर्स आणि सुरक्षा रक्षक अशा 150 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी मोफत धान्य वाटप आयोजित केले होते.

96

ग्रँड मराठा फाऊंडेशन या महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेने मुंबईतील नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या सहकार्याने अंध व्यक्तींसाठी मोफत धान्य आणि फोल्ड होणाऱ्या काठ्यांचे वाटप आयोजित केले होते. या मोफत वितरण उपक्रमामुळे भाइंदरमधील काशी नगर येथील 100 अंध व्यक्तींना लाभ झाला. नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड, मुंबईचे अध्यक्ष अनिल दळवी आणि नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड, मुंबईचे सचिव हरिचंद्र पाटील यांच्या साह्याने ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त माधवी शेलटकर आणि ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला होता.

धान्य वाटप मोहिमेबद्दल ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक, सिने निर्माते रोहित शेलटकर म्हणाले, “मागील वर्षापासून कोविडचे महासंकट आणि आताची या आजाराची दुसरी लाट हा सगळ्यामुळे आपल्यासाठी फार आव्हानात्मक काळ होता. मात्र, अंध व्यक्तींना जीवनावश्यक बाबींसाठी काही पर्यायच नव्हता आणि त्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून रहावे लागत आहे. आम्हाला ही परिस्थिती आणि त्यांना हवे असलेले पाठबळ याची जाणीव आहे. त्यामुळेच आम्हाला शक्य त्या प्रकारे समाजाच्या हितासाठी काही करण्याच्या दृष्टीने आम्ही ही मोहीम राबवली आहे.”

जिमच्या 150 हून अधिक यांना मदत 

या संयुक्त उपक्रमाबद्दल नॅशनल सोसायटी फॉर द ब्लाइंड, मुंबईचे अध्यक्ष अनिल दळवी म्हणाले, “याआधीही अशा प्रकारच्या मोहिमा राबवणाऱ्या ग्रँड मराठ फाऊंडेशनसोबत या उपक्रमाचा भाग असणे ही आमच्यासाठी फार आनंदाची बाब आहे. त्यांना काळाची गरज समजते आणि त्यांनी अंध व्यक्तींना फार आवश्यक साह्य केले आहे.”  या आठवड्याच्या सुरुवातीला ग्रँड मराठी फाऊंडेशनने ठाण्यातील रामचंद्र नगर येथील मसल बील्ड फिटनेस जीममधील देखभाल करणे कर्मचारी, ट्रेनर्स आणि सुरक्षा रक्षक अशा 150 हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी मोफत धान्य वाटप आयोजित केले होते. राज्यभरातील जीम/जीमनॅशिअमवर बंधने आल्याने मर्यादित उत्पन्नाची समस्या जीममधील कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे ही मोहीम राबवण्यात आली होती.

 ग्रँड मराठा फाउंडेशनविषयी

ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना सर्वांगीण शैक्षणिक पाठबळ पुरवले जाते, त्यामध्ये आधुनिक तंत्राची योग्य किंमत समाविष्ट असून शेतकऱ्यांच्या पाठी लागलेले कर्ज व गरिबीचे दुष्टचक्र मोडीत काढून त्यांना चांगल्या आयुष्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या वतीने विशेष लक्ष हे विदर्भावर देण्यात आले असून शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून आर्थिक साह्य देऊ करण्यात येते, त्याचप्रमाणे कृषी पट्ट्यात व ग्रामीण भागात शेतीपूरक कार्यक्रम राबवून विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.