Health Tips : आहारात ‘या’ फळांचा समावेश आवर्जून कराच !

केसांची काळजी घेण्यासाठी फळांचे सेवन हे टॉनिकप्रमाणे काम करते.

127
Health Tips : आहारात 'या' फळांचा समावेश आवर्जून कराच !
Health Tips : आहारात 'या' फळांचा समावेश आवर्जून कराच !

आपल्या आहारात फळांचा नियमित समावेश केल्याने शरीर निरोगी राहते. यामुळे शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. फळांच्या सेवानाने शरीराला दिवसभर आवश्यक असणारी ऊर्जा मिळायला मदत होते. फळं खाण्यामुळे पचनक्रिया अधिक सोपी होते आणि अनेक आजार आपल्या शरीरापासून दूर राहण्यास मदत होते. जाणून घेऊया आहारात कोणत्या फळांचा समावेश आवर्जून करायला हवा.

ब्लड प्रेशर, हार्ट स्ट्रोक, हृदयरोग आणि मधुमेह अर्थात डायबिटीससारखे आजार नियंत्रणात राखण्यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये फळांचा अवश्य समावेश करून घ्यावा. सकाळच्या वेळी फळं खाल्ल्यास, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.

(हेही वाचा – Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे ‘हे’ आहेत प्लेइंग-11 )

जीवनशैली कशीही असली तरीही फळं खाल्ल्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास अधिक फायदेशीर ठरते. खनिज आणि शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी नियमित फळांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे. फळांमध्ये विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन सी चा खजिना भरलेला आहे, जो शरीरासाठी आवश्यक ठरतो.

पोटॅशियमयुक्त असणारे रताळे, अवाकाडो, केळे आणि सफरचंदाचे सेवन करावे. ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यासाठी संत्री, केळे आणि अवाकाडोचे सेवन उत्तम ठरते. केसांची काळजी घेण्यासाठी फळांचे सेवन हे टॉनिकप्रमाणे काम करते. अँटीऑक्सिडंट्सयुक्त फळं ही स्किन चांगली राखण्यास मदत करतात आणि शरीरातील विटामिन्सची कमतरता भरून काढतात. फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यासाठी रोज सफरचंद खाणे अधिक फायदेशीर ठरते.

पेर, पेरू, सीताफळ, रामफळ, स्ट्रॉबेरी, कलिंगड अशी हंगामी फळं आवर्जून खावीत. आतड्यांचे आरोग्य सुधारून शरीर अधिक हेल्दी राहण्यास मदत करते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.