संपूर्ण लसीकरण झालेले भारतीय ‘या’ 7 देशात जाऊ शकतात!

212

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांनी प्रवाशांवर निर्बंध लावले होते. परंतु काही देशांनी आता निर्बंध शिथिल केले आहेत. जर, तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर, तुमच्या आनंदाची बातमी आहे. संपूर्ण लसीकरण झालेले भारतीय प्रवासी आता खालील 7 देशांमध्ये जाऊ शकतात.

( हेही वाचा : भारतातील ‘ही’ ठिकाणं देतील विदेश प्रवासाचा आनंद! )

1. थायलंड
देशाच्या पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी थायलंडने 1 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी असलेले निर्बंध शिथिल केले असून आता तुम्ही थायलंडला गेल्यास क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता नाही.

2. यूके
11 फेब्रुवारीपासून, संपूर्ण लसीकरण झालेल्या भारतीयांना यूकेला भेट देण्यासाठी प्रवासापूर्वी कोविड-19 चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

3. सायप्रस
मार्चपासून भारतीयांना सायप्रस देशाला भेट देण्यासाठी प्रवासापूर्वी कोविड-19 चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

4. व्हिएतनाम
व्हिएतनाम काही मार्गदर्शक तत्त्वांसह प्रवाशांना प्रवासासाठी परवानगी देत ​​आहे.

5. इस्राईल
इस्राईल देशामध्येही आता मार्गदर्शक तत्वांचे पालन करत, प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

6. सेंट लुसिया
सेंट लुसियामध्ये आता पूर्णपणे लसीकरण झालेल्या प्रवाशांना प्रवेश मुभा देण्यात आली आहे, परंतु हे प्रवासी फक्त सरकारी मान्यताप्राप्त हॉटेल्समध्येच राहू शकतात.

7. सिंगापूर
संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना आता सिंगापूरला भेट देण्यासाठी कोविड विषयक अनिवार्य चाचण्या करण्याची आवश्यकता नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.