-
ऋजुता लुकतुके
अलीकडे एकूणच सरकारी कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. याला कारण कंपन्यांची तिमाही कामगिरी आणि क्षमता वाढवण्यासाठी कंपन्या करत असलेले प्रयत्न कारणीभूत आहेत. अशीच एक सरकारी इंधन कंपनी गेल मार्च महिन्यात भाव खावून गेली. गुंतवणूकदारांनी या शेअरला उचलून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणात उलाढाल या कंपनीच्या शेअरमध्ये दिसून आली. अख्ख्या महिन्याचा आढावा घेतला तर मागच्या ३० दिवसांत गेलचा शेअर १६ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजे शेअरमध्ये २२ अंशांची वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना हा शेअर १८२.३० अंशांवर स्थिरावला आहे. (Gail Share Price)
शुक्रवारी शेअरमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ दिसून आली. या शेअरमधील सरासरी दैनिक उलाढाल ही १३.७ दशलक्ष रुपये इतकी आहे. कंपनीच एकूण भाग भांडवल आहे १.२ लाख कोटी रुपयांचं. शेअरमध्ये महिनाभरात झालेल्या वाढीची कारणं समजून घेऊया, (Gail Share Price)
(हेही वाचा – Kunal Kamra च्या विरोधात 3 नवीन गुन्हे दाखल !)
गेल कंपनीच्या तिमाही निकालांनी मागच्या सलग पाच तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. सध्या कंपनीचा महसूल जवळ जवळ ३३,००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर निव्वळ नफा २,००० कोटींच्या घरात आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू महामंडळाने गेल कंपनीला अलीकडेच क्षमता वाढवण्याची परवानगी दिली आहे. दाहेज – उरण – दाभोळ – पनवेल या मार्गावरील कंपनीची पाईपलाईन वाढवली जाणार आहे. कंपनीची इंधन निर्मितीची क्षमता त्यामुळे १९.९ वरून २२.५ मेट्रिक टनांवर पोहोचणार आहे. (Gail Share Price)
तर गेल इंडियाने अलीकडेच कोल इंडियाशी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार, दोन्ही कंपन्या एकत्र येऊन एक उपक्रम हाती घेणार आहेत. त्यात कोळशापासून कृत्रिमरित्या नैसर्गिक वायू बनवला जाणार आहे. अशा सकारात्मक बातम्यांमुळे कंपनीचा शेअरही वधारलेला आहे. (Gail Share Price)
(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community