गणपती बाप्पाचे आधार कार्ड; स्कॅन करा घ्या दर्शन

139

देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. परंतु झारखंडमधील जमशेदपूरमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त एक आगळीवेगळी संकल्पना साकारण्यात आली आहे. जमशेदपूरमध्ये एक मंडप तयार करण्यात आला आहे. या आधार कार्डमध्ये गणपती बाप्पाचा कैलासमधील पत्ता आहे. गणपतीची जन्म तारीख सहाव्या शतकातील देण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुंबई विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड; मिळणार ४० हजारापर्यंत पगार )

आधार कार्ड थीम

या गणेशमंडळाचे पदाधिकारी आणि आयोजकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोलकाता येथे फेसबुक थीम असलेल्या मंडळाची संकल्पना पाहिल्यानंतर त्यांना हा आधार कार्ड थीम असलेला मंडप बनवण्याची कल्पना सुचली. यावर क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला बाप्पाचे दर्शन मिळणार आहे. तसेच ज्यांनी आधार कार्ड बनवलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर बनवावे हा महत्त्वाचा संदेश आयोजन सरव कुमार यांनी दिला आहे.

या आधार कार्ड थीम असलेल्या मंडळात क्यूआर कोड, आधार क्रमांक सुद्धा मेन्शन करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या थीमचे सर्व फोटो तुम्ही पाहू शकता…

New Project 17

New Project 18

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.