गणेशस्तुतीच्या मंगल स्वरांत ‘दगडूशेठ’ मंदिरात गणेशजन्म सोहळा!

159

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज  ४ फेब्रुवारी २०२२ रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला.  मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक ,स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक  कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत  आळंदी येथील संत परंपरा असलेले प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, कलावंत गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केलं. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, गोंधळातील गण, शाहिरी, गण, डफया, गोंधळ, गवळण, जुगलबंदी, आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला  कामधेनू गायीचं  सुंदर विलोभनीय असे प्रतीक आणि आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे

बाप्पाची प्रार्थना

पार्वतीच्या उदरी गणेश जन्मला…बाळा जो जो रे… च्या मंगल स्वरांत पाळणा म्हणत महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभाग घेत गणेशाचरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत प्रार्थना केली.

( हेही वाचा : माघी गणेश जयंतीला अशी करा बाप्पाची उपासना! )

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात सिद्धार्थ गोडसे तन्वी गोडसे यांसह शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने, मालन चव्हाण यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अर्चना भालेराव, सुवर्णा इनामदार, राधिका बावकर, संध्या अवचट, हेमलता डाबी यांनी गणेश गीत, गणेश जपमाळ, गणपतीचा गजर, अथर्वशीर्ष म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.