७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव म्हणजे घरातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रभरात आनंदाचं वातावरण पसरतं. गणपती बाप्पा आपल्याला सुख-समृद्धी द्यायला येतो आणि जाताना आपल्या सगळ्या समस्या घेऊन जातो. म्हणूनच तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे.
गणपती बाप्पाचं आगमन होण्याआधी सर्व भाविक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीला लागतात. त्यापैकी सर्वात मोठी तयारी आणि जबाबदारी म्हणजे गणपतीसाठी सजावट. (ganesh puja decoration) केवळ सार्वजनिक मंडळांमध्ये नव्हे तर घरात सुद्धा सुंदर सजावट केली जाते, चलचित्र दाखवले जातात. आज आपण गणपतीसाठी सजावट कशी करायची याबद्दल चर्चा करणार आहोत.
थीम-आधारित सजावट :
पर्यावरणास अनुकूल, पारंपारिक किंवा आधुनिक अशा थीमची निवड करा. थीममध्ये निसर्ग-प्रेरित डिझाईन्स, बलून सजावट किंवा विशिष्ट रंगसंगती देखील समाविष्ट असू शकते. दर वर्षी नवीन थीम निवडली तर तुमच्या घरच्या गणपतीचीही चर्चा सर्वदूर पसरते.
दरवाजाची सजावट :
गणपती बाप्पा येणार तर त्याचं स्वागत थाटामाटात नको का व्हायला? घराचं प्रवेशद्वार सुंदर सजवा आणि बाप्पाचे स्वागत करा. केळीची पाने, आंब्याची पाने, झेंडूच्या हार आणि रंगीबेरंगी रांगोळी वापरा यांचा वापर करुन तुम्ही एक सुंदर उत्सवाचं वातावरण तयार करु शकता.
एलईडी लाईट्स :
एलईडी लाईट्सद्वारे तुम्ही छान सजावट करु शकता. इतकंच काय तर गणेशोत्सच्या चलचित्रासाठी लाईट्स ऍंड साऊंड शो चं प्रदर्शन देखील दाखवू शकता. साधे तेलाचे दिवे वापरुनही एक विशिष्ट सुंदर सजावट (ganesh puja decoration) करुन तुम्ही तुमचं घर उजळून टाकू शकता.
फुलांची सजावट :
मंडप आणि आजूबाजूचा परिसर सजवण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांचा वापर करा. कृत्रीम साहित्याचा प्रचार खूप होत असला तरी फुलं नैसर्गिक असतात आणि त्यांचा संबंध आपल्या मनाशी असतो. सुंदर आणि सुगंधित फुलांची सजावट केल्याने उत्सवामध्ये आपलम मन शांत राहतं आणि घरातलं वातावरण देखील पवित्र राहतं.
(हेही वाचा – Slow Customer Service मुळे २०२३ मध्ये भारतीयांनी गमावला १५ अब्ज तासांचा वेळ)
स्टेजची सजावट :
चांगला कापड, ताजी फुले आणि इतर अनेक साहित्य वापरुन गणपतीच्या मूर्तीसाठी एक आकर्षक स्टेज तयार करा. बहु-रंगीत एलईडी लाईट्स देखील लावू शकता. गणपती जिथे ठेवला आहे, तो स्टेज, टेबल सुंदर आणि स्वच्छ दिसेल याची खात्री करा.
रांगोळी काढा :
हिंदुंच्या सणांमध्ये रांगोळी नसेल तर सण पूर्ण होत नाही. त्यामुळे सजावटीसाठी रांगोळीचा आधार घ्या. रांगोळी, फुले किंवा तांदूळापासून बनवलेल्या उत्तम रांगोळी डिझाइमुळे तुमचे प्रवेशद्वार आकर्षित दिसते. स्वागत करण्यासाठी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हाला रांगोळी काढता येत नसेल तर “संस्कार भारती” सारख्या संस्थांच्य रांगोळी तज्ञांची मदत घ्या.
हँगिंग डेकोरेशन :
हँगिंग लाइट्स, पेपर कंदील आणि पारंपारिक टोरन्स वापरुन तुमच्या सजावटीमध्ये (ganesh puja decoration) आणखी भर घाला.
गणपतीच्या मागची सजावट :
जिथे गणपती विराजमान असतो, त्या मागची सजावट देखील महत्त्वाची आहे. फॅब्रिक्स, फुले किंवा अगदी DIY क्राफ्ट्सचा वापर करून गणपतीच्या मूर्तीसाठी सर्जनशील पार्श्वभूमी तयार करा. यामुळे मूर्ती उठून दिसेल.
आकर्षक पूजा साहित्य :
पूजेचे साहित्यही आकर्षक दिसायला हवे. म्हणजे अगदी साधी गोष्ट म्हणजे आपण धूप करतो. पण युट्यूबवर अनेक रिल्स उपलब्ध आहे, त्याज धूप देखील आकर्षक पद्धतीने, थीम करुन बनवलेले असतात. जणू झर्याचा देखावा आहे आणि त्यावर विशिष्ट पद्धतीने धूप ठेवला जातो आणि आपल्याला वाटतं की जणू झर्यातून धूप नव्हे तर पाणीच पडत आहे.
पर्यावरणाची काळजी घ्या :
हे सगळं करत असताना पर्यावरणाची काळजी नक्कीच घ्या. सर्व गोष्टी पर्यावरणपूरक असायला हव्यात. मातीच्या मूर्ती, नैसर्गिक फुले आणि जैवविघटनशील सजावट (ganesh puja decoration) यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने जाणीवपूर्वक करा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community