रुईया नाक्यावर विद्यार्थ्यांच्या राजाचे जल्लोषात आगमन

103

मुंबईच्या माटुंगामधील रुईया कॉलेज समोर रुईयानाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचं आगमन झाले आहे. यावेळी रुईया महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी ढोल ताशाचा गजरात विद्यार्थ्यांच्या राजाचं स्वागत केलं. यंदा विद्यार्थ्याच्या राजाचे ४५वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. म्हणून याला अनुसरून देखावा तयार करण्यात आला आहे. सर्वत्र जनजागृती व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी हा देखावा तयार केला आहे.

विद्यार्थ्यांच्या राजाचा देखावा तयार करणारे कलाकार आजी-माजी विद्यार्थी.

अभिषेक कानडे, रोहित निकम, सतीश खबाले, सुशांत रिसबुड, अनुभव पवार, वरद पेडणेकर, श्रुती म्हात्रे, मेहुल मोखरा, आकाश मोरे, असित कुलकर्णी आणि रुईया कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.