गंगा विलास क्रूझने प्रवास करायचाय? जाणून घ्या तिकीट दर, कुठे कराल बुकिंग?

164

केंद्र सरकारने नद्यांमधून सर्वाधिक लांबीची सफर करणारी गंगा विलास ही क्रूझ सुरू केली आहे. ‘एमव्ही गंगा विलास’ असे या क्रूझचे नाव असून हे जहाज 50 दिवसांमध्ये 3200 किलोमीटरहून अधिक प्रवास करेल. जलमार्गाद्वारे पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

( हेही वाचा : पुणे महानगरपालिकेची कामे आता व्हॉट्सॲपवर! चॅटबॉट सेवेचा विस्तार )

क्रूझच्या तिकिटाची किंमत किती?

या क्रूझवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अनेक पॅकेज डिझाईन केले आहेत. या क्रूझचे सर्वात महाग तिकीट ४ लाख ३७ हजार रुपये तर सर्वात कमी तिकीट ९० हजार रुपये इतके आहे. या क्रूझवरून कोलकाता ते वाराणसी हा प्रवास करण्यासाठी १२ दिवसांचा वेळ लागणार आहे.

  • कोलकाता ते ढाका प्रवास – ४ लाख ३७ हजार रुपये
  • कोलकाता ते मुर्शिदाबाद – २ लाख ९३ लाख रुपये

या क्रूझने प्रवास करण्यासाठी तुम्हाला https://www.antaracruises.com/ वर लॉग इन करावे लागणार आहे.

क्रूझचा मार्ग

एमव्ही गंगा विलास क्रूझ ही पाटणा, साहिबगंज, कोलकाता, ढाका आणि गुवाहाटी सारख्या 50 पर्यटन स्थळांमधून जाणार आहे. या क्रूझचा प्रवास 13 जानेवारीला वाराणसीपासून सुरू होईल आणि 1 मार्चला ही क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीघाट येथून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. या प्रवासात क्रूझ प्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र सारनाथ, प्रसिद्ध मायोंग आणि नदीत बांधलेल्या माजुली या बेटालाही भेट देईल. या क्रूझच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक सहभागी होणार आहेत. एमव्ही गंगा विलास क्रूझच्या उद्घाटनामुळे भारत देखील रिव्हर क्रूझ क्षेत्रात जागतिक पातळीवर स्थान मिळवेल. सध्या देशात वाराणसी आणि कोलकाता दरम्यान आठ रिव्हर क्रूझ कार्यरत आहेत. याशिवाय दुसऱ्या राष्ट्रीय जलमार्गावर म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदीतही क्रूझ वाहतूक सुरू असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.