Ganpatipule Maharashtra : गणपतीपुळे मंदिरात बाप्पाच्या भक्तीत तल्लीन व्हा; कसे घ्याल बाप्पाचे दर्शन?

112
Ratnagiri : समुद्राच्या लाटांमुळे गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षक भिंतीची पडझड

कोकणाचं सौंदर्य आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. तुम्हाला जर स्वर्ग पाहायचं असेल तर कोकणात यावंच लागेल. त्यात गणपतीपुळे (Ganpatipule) येथे येणे म्हणजे कोकणचं नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्मिक अनुष्ठान यांचा मिलाप. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रातील हे एक छोटेसे खेडेगाव… तसेच हा एक सुंदर समुद्रकिनारा आहे, जिथे पर्यटक आणि भाविक दोघेही भेट देतात. येथील स्वच्छ निळे पाणी पर्यटकांना खूप आकर्षित करते. (Ganpatipule Maharashtra)

लोककथेनुसार हिंदू देवता गणपती, एका महिलेने केलेल्या टिप्पणीवर रागावले, गुळे येथील त्यांच्या मूळ निवासस्थानातून पुळे येथे आले, त्यानंतर या क्षेत्राचे नाव गणपती-पुळे असे ठेवण्यात आले. येथे दररोज मोठ्या संख्येने दूरदूरवरून पर्यटक येतात. राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यात असणारे हे लहान किनारपट्टीचे शहर आहे. अथांग निळाशार समुद्र, खारफुटी आणि नारळाच्या झाडांच्या हिरवाईने वसलेले गणपतीपुळे (Ganpatipule) हे महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. अध्यात्म, निसर्ग आणि मानवी भावना यांचे अद्भुत मीलन म्हणजे गणपतीपुळे… मनमोहक आल्हाददायक हवामान, पवित्र स्थळ आणि विलोभनीय गाव यांचे सुंदर मिलाप म्हणजे हे स्थळ आहे. (Ganpatipule Maharashtra)

(हेही वाचा – Drugs Seized : ‘एनसीबी’ने नगरमध्ये रोखली १२५ किलो गांजाची तस्करी; चौघांना अटक)

गणपतीपुळे हे मुख्यत: समुद्रकिनार्‍यासाठी ओळखले जाते, महाराष्ट्राला भेट देताना देशभरातील पर्यटक इथे येतात. शहरी गजबजाटापासून दूर, हा समुद्रकिनारा निवांत वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना खूप प्रभावित करते. इथले स्वच्छ निळे पाणी पर्यटकांना रोमांचित करते. (Ganpatipule Maharashtra)

स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळेचे (Ganpatipule) सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर ४०० वर्ष जुने गणेश मंदिर आहे. या मंदिराचा इरिहास १६०० वर्षांपूर्वीचा आहे. हे स्वयंभू गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी इथे भाविक दूर राज्यातून येतात. तुम्ही सकाळ-संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहून गणपती बाप्पाचे विशेष आशीर्वाद प्राप्त करु शकता. इथे आल्यावर तुम्ही एका अद्भुत अध्यात्मिक वातावरणात आला आहात अशी तुमची मनःस्थिती होते. तर भाविकहो आणि रसिकहो, गणपतीपुळेला या… इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घ्या आणि अध्यात्मिक वातावरणात तल्लीन व्हा. (Ganpatipule Maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.