-
ऋजुता लुकतुके
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सध्या स्पर्धा कमालीची वाढलेली आहे. चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, मायक्रोसॉफ्ट अझुरी हे चॅटबॉटही या स्पर्धेत उतरले आहेत. टेक्स्ट, इमेज, गोषवारा लिहिणे, एखादा कोड तयार करणे, माहिती मिळवणे आणि एकाचवेळी टेक्स्ट, व्हीडिओ, संगीत असं एकाच प्रोजेक्टमध्ये संकलित करणं अशी कामं गुगल जेमिनी करू शकतं. (Gemini AI)
तुम्ही लिखित किंवा आवाजाने गुगल जेमिनीला संदेश देऊ शकता. त्यानंतर काही सेकंदांत जेमिनी तुम्हाला तुमच्या समस्येवर उत्तर देईल. (Gemini AI)
(हेही वाचा – Exam : स्थगित दुय्यम अभियंता स्थापत्य पदाची परीक्षा येत्या १३ आणि १४ मे २०२५ रोजी होणार)
आता गुगल एआय जेमिनी कसं वापरायचं ते पाहूया :
१. gemini.google.com या वेबसाईटवर गेलात किंवा जेमिनी ॲप डाऊनलोड केलंत की तुम्ही जेमिनी वापरायला सिद्ध असाल.
२. मधोमध जो मेसेज बॉक्स येईल त्यावर तुम्ही टेक्स्ट किंवा आवाजी संदेश लिहायचा आहे. तो लिहिल्यावर एंटर दाबायचं आहे.
३. सर्च विंडेजवळ असलेला मायक्रोफोन वापरून तुम्ही तुमचा संदेश रेकॉर्ड करू शकता.
४. शिवाय जेमिनी लाईव्ह सेवाही तुम्ही वापरू शकता. (Gemini AI)
(हेही वाचा – Niva Bupa Share Price : नोव्हेंबर २०२४ मध्ये नोंदणी झालेल्या निवा बुपा शेअरची वाटचाल कशी आहे?)
गुगल जेमिनी एआय कशासाठी वापरू शकता ते बघूया :
१. लेखी मजकूर तयार करणे – पत्र, ईमेल, कथा, कविता, कोड किंवा कुठलीही लिखित माहिती विशिष्ट फॉरमॅटमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता.
२. इमेज जनरेशन – तुम्ही चॅटबॉटला लिखित माहिती पुरवली तर जेमिनी तुम्हाला चित्रही काढून देऊ शकेल.
३. गोषवारा – ईमेल, संवाद (कॉन्व्हर्सेशन) व कागदपत्र यांचा गोषवारा तयार करणं हे कामही जेमिनी करतं.
४. कोडिंग – कोडिंगची सगळी कामं जेमिनी करू शकतं. वेबसाईट तयार करेपर्यंत जेमिनीची मदत होऊ शकते.
५. मल्टी मोडल इनपूट – टेक्स्ट, इमेज, आवाज असे सगळे इनपूट एकत्र करून संकलित करून एक सादरीकरण तयार करण्याचं काम जेमिनी करू शकतं
हे जेमिनीकडून करून घेण्यासाठी तुम्ही नेमक्या शब्दांत आपली कमांड जेमिनीला द्यायला हवी. तसंच प्रत्येक कमांड ही वेगळी असते. बदललेल्या प्रत्येक कमांडमधून जेमिनी वेगवेगळा मजकूर देऊ शकतं. यासाठी कमांड वेगवेगळ्या पद्धतीने देऊन बघा आणि आवडेल ते ठेवा. जेमिनीकडून आलेलं उत्तर हे सेव्ह करून ठेवा. ते हरवू शकतं. (Gemini AI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community