- ऋजुता लुकतुके
जीई लिमिटेड ही अमेरिकेत १८९२ साली स्थापन झालेली संरक्षण क्षेत्रातील कंपनी आहे. अलीकडे संरक्षण क्षेत्रात भारत आणि अमेरिकेनं सहकार्य करार केल्यानंतर महत्त्वाची संरक्षण सामुग्री आपण अमेरिकन कंपन्यांकडून मागवायला सुरुवात केली आणि यातीलच एक कंपनी आहे जनरल इलेक्ट्रिक कंपनी. एचएएलच्या पाठोपाठ या कंपनीकडून भारत संरक्षण सामुग्री मागवत असतो. अगदी भारतीय बनावटीच्या तेजस विमानाचं इंजिनही जीई कंपनीचं आहे. तेव्हापासून गेल्या वर्षभरात जीई इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरची चलती भारतीय बाजारांमध्येही सुरू झाली. (General Electric Share Price)
मागच्या वर्षभरात हा शेअर दुपटीपेक्षा वाढला. ५२ आठवड्यात या शेअरने ८४ रुपयांपासून थेट १९४ रुपयांची मजल मारली आहे. ही वाढ अडीचपट आहे. पण, पंधरा दिवसांपूर्वी कंपनीचा तिमाही निकाल काहीसा खराब होता आणि त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या शेअरमध्ये भारतात ८ टक्क्यांची घसरण दिसून आली. पण, आता हळू हळू शेअर सावरतोय आणि मागच्या पाच दिवसांत पुन्हा एकदा शेअरने १८० चा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना जनरल इलेक्ट्रिकचा शेअर ५ अंशांनी वाढून १८४ वर बंद झाला. शेवटच्या ५ दिवसांत या शेअरमध्ये तब्बल साडेसहा टक्क्यांची वाढ झाली आहे. (General Electric Share Price)
(हेही वाचा – मुंबईच्या प्रलंबित प्रकल्पासंदर्भात Rahul Shewale यांचा थेट मविआ वर निशाणा; म्हणाले…)
मागच्या पंधरवड्यात शेअर सावरत असताना पुन्हा एकदा एक खराब बातमी आली आहे. तेजस विमानांमध्ये जीई कंपनीची एफ४०४ बनावटीची इंजिन वापरली जातात. पण, २०२३ पासून या इंजिनांचा पुरवठा अपेक्षित होता. तो अजून सुरू झालेला नाही. त्यामुळे भारतीय संरक्षण मंत्रालयाने आता जीई कंपनीकडून विलंब शुल्क आकारण्याची भूमिका घेतली आहे. त्यादृष्टीने कारवाई सुरू करण्यात येणार आहे. (General Electric Share Price)
एचएएल कंपनीने जीई कंपनीशी ९९ एफ४०४ विमान इंजिनांसाठी ७७० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार २०२१ मध्ये केला होता. आणि इंजिनांचा पुरवठा २०२३ च्या सुरुवातीपासून सुरू होणं अपेक्षित होतं. इंजिन पुरवठा होत नसल्यामुळे तेजसचं उत्पादनही होऊ शकणार नाहीए. त्यामुळे हा प्रश्न केंद्र सरकार गंभीरपणे घेऊल यात शंका नाही. आगामी दिवसांत जीई कंपनीच्या शेअरवर याचा परिणाम होऊ शकतो. (General Electric Share Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community