केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तूप ठरते वरदान!

केसांमध्ये गरम (कोमट) तुपाने मालिश केल्यास डोक्याच्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. तुपामध्ये औषधी द्रव्येही आहेत, जी त्वचेमध्ये सहजपणे शोषली जातात.

तूप ही वस्तू बहुपयोगी असते. त्याचा विविध गोष्टींसाठी वापर होतो. विशेष म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी तुपाचा खास वापर होतो. तुपाच्या सात्विकतेमुळे त्याचे दुष्परिणाम आढळून येत नाहीत. म्हणून कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी तुपाचा वापर फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहित आहे का, तुमचे केस अधिक चमकदार होण्यासाठी आणि त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठीही तुपाचा वापर करता येऊ शकतो, त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही एकदा तुपाचा वापर करून बघा.

केसांवरील उपाय स्वयंपाकगृहात दडला!

निर्जीव केस पाहिल्यावर अनेकांना चिंता वाटते. विशेषतः महिलांच्या केसांना फाटे फुटणे, केस मोठ्या प्रमाणावर गळणे, केस रुक्ष होणे, अशा अनेक समस्यांनी महिला त्रस्त असतात. त्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक महिला वेगवेगळे शाम्पू वापरतात. रासायनिक उपाय करतात, मात्र लक्षात घ्या, यावरील एक उत्तम उपाय हा तुमच्या स्वयंपाक घरात दडला आहे. त्यामुळे जर केसांच्या समस्येवर तुम्ही जर रसायनांचा भडीमार करत असला तर, त्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर करत असला तर तुम्ही आता पूर्णपणे घरगुती उपायाकडे वळा. ज्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य आणखी खुलवू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातील तूप फायद्याचे ठरेल.

(हेही वाचा : स्वतःच्या मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा दिला नरबळी! )

तुपाने मालिश करून डोक्याचा रक्तप्रवाह वाढतो! 

आयुर्वेदात उल्लेख करण्यात आलेल्या मौल्यवान साहित्यामध्येही तुपाचा समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी तर तूप म्हणजे जणू एक वरदान. रासायनिक उत्पादनांकडे पाठ फिरवून नैसर्गिक उपाय करण्याचा तुमचा मनसुबा असल्यास तूप हा एक उत्तम पर्याय ठरेल. केसांमध्ये गरम (कोमट) तुपाने मालिश केल्यास डोक्याच्या भागातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. तुपामध्ये औषधी द्रव्येही आहेत, जी त्वचेमध्ये सहजपणे शोषली जातात. डीप कंडिशनिंग करुन रुक्ष आणि निर्जीव केसांमध्ये तुपामुळे पुन्हा एक वेगळीच चमक येते. केसांना तूप लावल्यानंतर शॉवर कॅपच्या सहाय्याने केस झाकून रात्रभर ते तसेच ठेवावे आणि सकाळी स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्यावेत. यासाठी एक चमचा तूप केसांच्या मुळाशी चोळून काही तासांनंतर केस स्वच्छ धुवावेत. याचे परिणाम जाणून घेण्यासाठी एक आठवड्यातून दोनदा असे करुन पहा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here