प्लास्टिक द्या, मोफत खा! १ किलो प्लास्टिक दिल्यावर मिळणार १ प्लेट पोहे; असाही एक कॅफे

केंद्र सरकारने १ जुलैपासून देशभरात प्लास्टिक बंदीचा नियम लागू केला आहे. त्यावर कठोर अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये एक अनोखा कॅफे सुरू करण्यात आला आहे. या कॅफेचे नाव ‘प्राकृतिक प्लास्टिक कॅफे’ असे आहे. या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याच प्रकारचे प्लास्टिक वापरले जाणार नाही. या कॅफेत फक्त सेंद्रीय उत्पादनापासून बनवलेले पदार्थच तयार केले जाणार आहेत.

( हेही वाचा : मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! सगळ्या लोकल AC होणार, पंतप्रधान कार्यालयाने दिले आदेश )

प्लास्टिक द्या आवडीचे पदार्थ खा

जुनागढमधील हा ‘प्राकृतिक प्लास्टिक कॅफे’ लवकरच सुरू होणार आहे. या कॅफेत जाण्यासाठी तुम्हाला पैशांची आवश्यकता नसून घरातील प्लास्टिक कचरा तुम्हाला गोळा करून न्यायचा आहे. प्लास्टिक दिल्यावर तुम्ही तुमचे आवडीचे पदार्थ या कॅफेत खाऊ शकणार आहात.

१ किलो प्लास्टिक दिल्यावर १ प्लेट पोहे 

या कॅफेत ५०० ग्रॅम प्लास्टिक दिले की, त्याबदल्यात तुम्ही १ ग्लास लिंबू सरबत पिऊ शकता आणि तुम्ही १ किलो प्लास्टिक दिलात तर तुम्हाला १ प्लेट ढोकळा किंवा १ प्लेट पोहे दिले जाणार आहेत. यासोबतच तुम्ही या कॅफेमध्ये गुजराती पदार्थांचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता. तुम्ही जेवढं प्लास्टिक गोळा करून येथे जमा कराल तेवढे अधिक पदार्थ तुम्हाला दिले जातील. ३० जून रोजी जुनागढचे जिल्हाधिकारी या प्राकृतिक प्लास्टिक कॅफेचं उद्घाटन करणार आहेत. यासोबतच या कॅफेमधील प्लास्टिक कचरा गोळा करून नेण्यासाठी प्रशासनाने एक संस्था नेमली आहे. ही संस्था या प्लास्टिक कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here