अरेच्चा! भारतीयांना मिळताहेत श्रीलंकन डोळे

जागतिक अवयवदान विशेष

96

अंधश्रध्देच्या विळख्यातून बाहेर येत नेत्रदानाला आता ब-यापैकी सुरुवात होत असली, तरीही मागणी तेवढा पुरवठा हे समीकरण अद्यापही डोळ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांच्याबाबतीत घडताना दिसत नाही. भारतीयांची लोकसंख्या जगभरात दुस-या स्थानावर असली तरीही डोळ्यांसाठी मात्र भारतीय श्रीलंकावासीयांवर अवलंबून आहेत.

भारतात नेत्रदानासाठी प्रामुख्याने श्रीलंकेहून डोळे दान केले जातात. ही माहिती आश्चर्यकारक असली तरीही लोकसंख्येच्या तुलनेत कमी असलेल्या श्रीलंकेत नेत्रदानावर विशेष भर दिला जातो. बहुतांश श्रीलंकन नागरिक मरणोत्तर नेत्रदानासाठी आग्रही राहतात. शेजारच्या भारतात डोळ्यांसाठी मागणी जास्त असल्याने श्रीलंकेहून भारतीयांना नेत्रदान हमखास मिळतं. जनजागृतीमुळे आता भारतात  नेत्रदानासाठी पुढाकार घेतला जातोय, त्या तुलनेत डोळ्यांच्या प्रत्यारोपणासाठी वैद्यकीय क्षेत्राची अपेक्षित तयारी नसल्याचंही समोर दिसून येतंय.

(हेही वाचा – भारतातील कोरोना लसींनाही निष्प्रभ ठरवू शकतो ‘हा’ नवा व्हेरियंट?)

कित्येकदा कुटुंबीयांकडून मृत व्यक्तीकडून डोळे दान देण्यासाठी मंजुरी मिळते. मात्र संबंधित रुग्णालयांत आवश्यक साधनसामग्री तसेच डोळे मृताच्या शरीरातून काढण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण असणारे पुरेसे डॉक्टर्स नसतात. त्यामुळे डोळ्याच्या प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना वेळेवर डोळे मिळत नाहीत. डोळे शरीरातून अलगद काढण्यासाठी आवश्यक रसायनांचा पुरवठाही रुग्णालयात तयार नसतो. परिणामी कुटुंबीयांकडून होकार मिळूनही डोळे गरजू रुग्णालयांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणासाठी नियुक्त समन्वयकांची टीमने व्यक्त केलीय.

वैद्यकीय क्षेत्राकडून अपेक्षित मागणी 

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात नेत्रदानासाठी आग्रही वैद्यकीय डॉक्टरांची टीम प्रशिक्षणानंतर तयार करावी. जेणेकरुन गरजूंना वेळेवर डोळे मिळतील, द फेडरेशन ऑफ ऑर्गन डोनेशन् एण्ड बॉडी ऑर्गनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

डोळे दान करण्याची मर्यादित वेळ

रुग्णाला मृत घोषित केल्यानंतर पुढील सहा तासांत शरीरातून डोळे काढता येतात. त्यानंतर शरीरातील ऊतींच्या कार्यांना मर्यादा येते परिणामी सहा तासानंतर डोळे काढता येत नाही.

एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे चार जणांना दृष्टी

वैद्यकीय क्षेत्र खूप वेगाने प्रगती करतेय. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना डोळे मिळतात. आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे डोळ्याच्या एका कॉर्नियाचे दोन थर वेगवेगळ्या व्यक्तींना बसवले जातात. त्यामुळे एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे चार लोकांना दृष्टी देण्यात वैद्यकीय क्षेत्राला यश आलंय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.