वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पण परिचरिकांचं वेतन त्यांच्या कामासाठी असलेल्या समर्पणाशी सुसंगत आहे का? (gnm nursing salary)
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीवरून असं आढळून आलं की, भारतामध्ये नोंदणीकृत परिचारिकांचे सरासरी वार्षिक वेतन सुमारे ₹४.५ लाख इतके आहे. म्हणजेच दरमहा ₹४१ हजार एवढं वेतन परिचरिकांना दिलं जातं. फक्त संख्या पाहता हे वेतन आकर्षक वाटू शकतं. पण डॉक्टर आणि डेंटिस्ट यांसारख्या इतर वैद्यकीय तज्ञांच्या तुलनेत ते वेतन खूपच कमी आहे. अशा स्थितीमुळे कित्येक परिचारिकांना त्यांच्या पात्रता आणि कौशल्यानुसार वेतन मिळत नसल्याची त्यांची भावना आहे. याव्यतिरिक्त परिचारिकांचं वेतन हे त्यांचा अनुभव, पात्रता आणि कामाच्या ठिकाणावर अवलंबून असतं. (gnm nursing salary)
(हेही वाचा – rajwada palace nagpur : नागपुरातील राजवाडा पॅलेस हॉटेल कशासाठी प्रसिद्ध आहे?)
GNM नर्स आणि मिडवाइफरीचा पगार
एका GNM परिचारिकेचं वेतन दरमहा ₹४१,००० ते ₹९१,००० पर्यंत असू शकतं. GNM परिचारिकांचं वेतन त्यांच्या कामाच्या श्रेणीनुसार वर्षाकाठी ₹५ लाख ते ₹११ लाख पर्यंत असू शकतं. मिडवाइफरी हे वेतन कामाच्या श्रेणीनुसार दरमहा ₹१५,७०० ते ₹४५,१०० पर्यंत असू शकतं. (gnm nursing salary)
B.Sc केलेल्या परिचारिकांचं वेतन
भारतात B.Sc ही पदवी असणाऱ्या परिचारिकांचं सरासरी वेतन दरमहा ₹२५,००० ते ₹४०,००० दरम्यान असू शकतं. तरी हे वेतन अनुभव, स्थान आणि कामाचं पद यावर अवलंबून असतं. जसं की, दिल्ली, मुंबई, बंगळुरू किंवा चेन्नई सारख्या मोठ्या शहरांत काम करणारी परिचारिका दरमहा ₹३५,००० ते ₹४०,००० पर्यंत वेतन घेऊ शकते. तर इतर लहान शहरांत काम करणारी परिचारिका दरमहा ₹२०,००० ते ₹२५,००० पर्यंत वेतन घेते. (gnm nursing salary)
(हेही वाचा – “माझा नवरा निर्दोष…”, Kurla Bus Accident प्रकरणी चालकाच्या पत्नीची प्रतिक्रिया)
प्राथमिक उपचार केंद्राच्या परिचारिकांचे वेतन
प्राथमिक उपचार केंद्रात काम करणाऱ्या परिचारिकांचं वेतन हे त्यांचा अनुभव, नोकरीचं पद आणि स्थान इत्यादींवर अवलंबून असतं. दिल्ली, मुंबई, बंगळुरू किंवा चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या परिचारिका दरमहा ₹३५,००० ते ₹४०,००० पर्यंत वेतन घेऊ शकतात. तर इतर लहान शहरातल्या परिचारिकांना दरमहा ₹१५,००० ते ₹२५,००० पर्यंत वेतन असतं. (gnm nursing salary)
शासकीय रुग्णालयातल्या परिचारिकांचं वेतन
शासकीय इस्पितळात काम करणाऱ्या परिचारिकांची वेतन श्रेणी दरमहा ₹१५,७०० ते ₹४५,१०० एवढी असते. तरी त्यांचा अनुभव, स्थान आणि नोकरीचं पद यांसारख्या घटकांवर अवलंबून वेतन बदलू शकतं. (gnm nursing salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community