गोव्यामध्ये कलामहोत्सव सुरु आहे. प्राचीन धर्मग्रंथ व लोककथांचा संदर्भ घेऊन एका आऊटडोअर जीमचं रुपांतर ‘अवतार पार्क’ मध्ये करण्यात आले आहे. नरकासूर, रावण यांचे रुपांतर व्यायामाच्या उपकरणात करण्यात आले आहे. कलाकार दिप्तेज वेर्णेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
( हेही वाचा : व्हॉट्सअॅपवरून कसे काढाल तिकीट? मेट्रोसह मोनो रेल्वेच्या दैनंदिन माहितीसाठी ‘यात्री’ अॅप )
या कलाकाराने अफलातून कलाकारी सादर केली आहे. वर्णेकरांनी हा व्हिडिओ शुक्रवारी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर अपलोड केला होता आणि बघता बघता या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक वापरकर्ते या कलाकृतीची स्तुती करत आहेत. काही वापरकर्त्यांनी तर अद्वितीय कलाकृती असं म्हणत कलाकारांची पाठ थोपटली आहे. रसिकांनी दिलेली शाबासकीची थाप हीच कोणत्याही कलाकाराची कमाई असते. हा महोत्सव डिसेंबर महिन्यात संपन्न झाला.
गोव्यातील सेरेनदिपिती आर्ट्स फेस्टिवल दक्षिण आशियातील मोठा कला महोत्सव आहे. या महोत्सवातील सामान वेगवेगळ्या उत्सवांमधून घेतले आहेत. या व्हायरल होणार्या व्हिडिओत आपण पाहू शकतो की लोक आऊटडोअर जीममध्ये व्यायामाचा आनंद घेत आहे. पुराणातील पात्रांसोबत व्यायाम करण्याचा आनंदच वेगळा आहे, असा लोकांच्या चेहर्यावरील भाव स्पष्ट दिसत आहे. नरकासूर थीम असलेल्या एका चेस्ट प्रेस मशीनवर एक स्त्री आनंदाने व्यायाम करताना दिसते.
त्यानंतर मग आपल्याला दिसतं की एक तरुण रावणासोबत व्यायाम करतोय. विशेष म्हणजे दिप्तेज वेर्णेकर यांनी स्थानिक कलाकारांच्या मदतीने हा थीम पार्क तयार केला आहे. त्यांनी यासाठी कलाकारांचे कौतुक देखील केले आहे. दिप्तेज वेर्णेकर यांना या माध्यमातून शहरी मॅकेनिज्म आणि लोकल टेक्नोलॉजी यांचा मेळ साधायचा होता आणि त्यात त्यांना यश प्राप्त झालं आहे.
Join Our WhatsApp Community
View this post on Instagram