आतापर्यंत आपण पैसे काढण्यासाठी किंवा डिपोझिट करण्यासाठी ATM चा वापर केला आहे. परंतु आपल्या देशात असे पहिलेच एटीएम बसवण्यात आले आहेत ज्यामधून नागरिकांना चक्क सोने काढता येणार आहे. हे केवळ भारतातीलचं नाही तर जगातील पहिले रिअल-टाइम गोल्ड एटीएम आहे.
( हेही वाचा : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, पहा क्षणचित्रे)
गोल्ड एटीएम नेमके कसे आहे जाणून घेऊया…
देशात पहिल्यांदाच असे एटीएम बसवण्यात आले आहे याद्वारे नागरिक अगदी सहज सोने काढू शकतात. सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या गोल्डकॉइन कंपनीच्या या एटीएममधून सोन्याच्या नाण्यांचे ग्राहकांना वितरण केले जाते.
सोन्याची नाणी 0.5 gm, 1 gm, 2 gm, 5 gm, 10 gm, 20 gm, 50 gm आणि 100 gm या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. गोल्डसिक्का प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबादस्थित स्टार्टअप कंपनीने पहिले गोल्ड ATM लॉंच केले आहे. या एटीएममध्ये पाच किलो सोने ठेवण्याची क्षमता आहे. गोल्डसिक्का कंपनीचे उपाध्यक्ष यावार म्हणाले, गोल्डसिक्का ही कंपनी ४ वर्षांपूर्वी सुरू झाली असून आमच्या सीईओला ही अनोखी संकल्पना सुचली यानंतर संपूर्ण अभ्यास केल्यावर आम्ही हे ATM मशिन लॉंच केले आहे.
हे एटीएम मशिन हैदराबादमध्ये अशोक रघुपती चेंबर्स, प्रकाश नगर मेट्रो स्टेशन बेगमपेठच्या मुख्य कार्यालयात बसवण्यात आले आहे. प्रत्येक एटीएममध्ये ५ किलो सोने साठवण्याची क्षमता आहे. एटीएम मशिन 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंतची नाणी ग्राहकांना वितरीत करेल. आता नागरिक दुकानात न जाता थेट एटीएममधून सोने खरेदी करू शकतात. एटीएमद्वारे सोन्याची नाणी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा उपयोग करता येणार आहे.
Join Our WhatsApp Community