ब्रेसलेटमुळे पुरुष चांगले रुबाबदार दिसतात. मुलींना दागिने घालायची खूप हौस असली तरी चेन आणि ब्रेसलेट हे पुरुषांवर उठून दिसतात. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे ब्रेसलेट उपलब्ध आहेत. तुमची आवड, कोणत्या प्रसंगासाठी ब्रेसलेट घ्यायचे आहे इत्यादी घटकांनुसार तुम्ही ब्रेसलेटची निवड करु शकता. मात्र तुम्ही घातलेले ब्रेसलेट हे तुमच्या शरीराला आणि एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसे असायला हवे. चला तर ब्रेसलेटची निवड कशी करायची हे पाहुया : (Gold Bracelet For Men)
स्टाईल :
तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आधी जाणून घ्या. तुमची उंची, तुमचा रंग, शरीराची रचना जाणूनच ब्रेसलेट खरेदी करायला हवे. तुम्हाला कोणता लूक आवडतो, हे देखील महत्वाचे आहे. पुरुषांचे ब्रेसलेट विविध डिझाइन्समध्ये उपलब्ध असतात. मात्र निवड ही सर्वस्वी तुमची असते. (Gold Bracelet For Men)
प्रसंग :
आपण वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळे कपडे विकत घेतो. लग्नाला शक्यतो कुणी हुडी घालून जात नाही. बरेच लोक पारंपारिक पोशाख परिधान करतात. त्याचप्रकारे ब्रेसल्ट निवडताना तुम्ही कोणत्या प्रसंगांसाठी ते घालणार आहात हे ठरवा. प्रत्येक स्टाईल सर्वच प्रसंगात चांगली दिसत नाही. औपरिचारिक प्रसंगात क्लासिक डिझाइन निवडू शकता आणि कॅज्युअल प्रसंगात तुम्ही क्रिएटिव्हिटीला अधिक प्राधान्य देऊ शकता. (Gold Bracelet For Men)
देखावा :
देखावा म्हणजे एखादे ब्रेसलेट घातल्यावर तुमच्या मनगटावर ते कसे दिसेल हे सुद्धा महत्वाचे आहे. खूप घट्ट किंवा खूप सैल ब्रेसलेट घेऊ नका. तुम्ही बारीक असाल तर अगदी घट्ट आणि बारीक ब्रेसलेट घेऊ नका. थोडेसे जाडसर आणि थोडे सैल ब्रेसलेट घालू शकता. थोडक्यात तुमच्या मनगटानुसार ब्रेसलेटची निवड करा. (Gold Bracelet For Men)
(हेही वाचा – BCA Colleges In Mumbai : ’BCA’ करायचं आहे? मग जाणून घ्या मुंबईत कोणते कॉलेज आहे सर्वोत्कृष्ट?)
संशोधन करा :
सध्या पुरुषांच्या दागिन्यांना खूप महत्व आल्यामुळे अनेक फसवणारे लोक या क्षेत्रात उतरले आहेत. त्यामुळे ब्रेसलेट खरेदी करताना खबरदारी बाळगा. ज्या दुकानातून ब्रेसलेट घेणार आहात, त्याबद्दल माहिती काढा. विक्रेत्याकडे किती वर्षांचा अनुभव आहे, हे जाणून घ्या. (Gold Bracelet For Men)
गुणवत्ता तपासा :
तुम्ही गोल्ड ब्रेसलेट घेत असाल तर ते सोने कोणत्या दर्जाचे आहे हे तपासणे खूप महत्वाचे आहे. सुरक्षित आणि विश्वासू दुकानातून दागिने घेत असाल तर फसवले जाण्याची शक्यता कमी असते. मात्र लहान पेढीतून दागिने घेताना सोन्याची गुणवत्ता नक्कीच तपासा. (Gold Bracelet For Men)
रिटर्न पॉलिसी :
खरेदी करण्यापूर्वी वॉरंटी तपासा आणि रिटर्न पॉलिसी जाणून घ्या. तसेच पावती घ्यायला विसरु नका. कारण सोन्याची पावती वर्षानुवर्षे जपून ठेवायची असते. भविष्यात हे सोने मोडून दुसरे सोने खरेदी करताना कामी येते. (Gold Bracelet For Men)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community