Gold Bracelet For Women : मैत्रिणींनो, सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं आहे? मग या उपयुक्त टिप्स जरुर वाचा

125
Gold Bracelet For Women : मैत्रिणींनो, सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं आहे? मग या उपयुक्त टिप्स जरुर वाचा

दागिने आणि स्त्रियांचा संबंध अगदी जगाच्या सुरुवातीपासूनचा आहे असं म्हटलं तरी चालेल. पुरुषही दागिने घालतात. पण स्त्रियांचे दागिने पुरुषांपेक्षा संख्येने जास्त आणि नाजूक कलाकुसरीचे असतात. दागिन्यांमुळे स्त्रियांच्या सौंदर्यात जास्त भर पडते. (Gold Bracelet For Women)

अश्मयुगात दगडांचे दागिने :

डोक्यावरच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत सर्व प्रकारचे दागिने स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत. बदलत्या काळानुसार दागिन्यांच्या बनावटीमध्ये पुष्कळ बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अश्मयुगात स्त्रिया दगडाचे दागिने वापरायच्या. जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने वापरण्याची पद्धत सुरू झाली. जसे की, समुद्रातल्या शंखशिंपल्यांचे दागिने, हस्तिदंताचे दागिने इत्यादी. मग सोन्याचांदीचे, रत्नांचे दागिने लोक वापरायला लागले. (Gold Bracelet For Women)

सोन्याचे दागिने :

सोनं हा सर्वांत महागडा धातू आहे. एखाद्या स्त्रीकडे सोन्याचे दागिने असणे म्हणजे वैभवाचं लक्षण मानलं जातं. पूर्वी श्रीमंत स्त्रिया अंगभर दागिन्यांनी मढलेल्या असायच्या. जसजसा काळ बदलत गेला तसतसं स्त्रियांना जड दागिन्यांपेक्षा नाजूक आणि वजनाने हलके असणारे दागिने आवडायला लागले. एवढंच नाही तर दागिन्यांमध्ये हल्ली अनेक व्हरायटीही आपल्याला पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला स्त्रियांच्या हातातील ब्रेसलेटबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला साजेसे ब्रेसलेट निवडण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण पाहुयात.. (Gold Bracelet For Women)

सोन्याचे ब्रेसलेट कसे निवडाल?

ब्रेसलेटचे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सोन्याच्या ब्रेसलेटमध्ये तुम्ही मोती आणि वेगवेगळ्या प्रकारची रत्ने वापरून तुम्हाला हवी तशी डिझाईन कस्टमाईझ करून ब्रेसलेट तयार करून घेऊ शकता. (Gold Bracelet For Women)

(हेही वाचा – शिंदे – दादांच्या मिळून ४० आमदारांची घरवापसी; Vijay Wadettiwar यांचा दावा)

ऑनलाईन खरेदी :

सोन्याचं ब्रेसलेट घडवून घेताना किंवा तयार असलेलं ब्रेसलेट विकत घेताना तो सोनार विश्वासार्ह आहे की नाही याची खात्री करून घ्या. हल्ली तयार दागिने विकणारे अनेक ज्वेलर्स आपल्याला ऑनलाईन विक्री करताना दिसतात. तुम्ही त्यांच्यापैकीही एखाद्या विश्वासार्ह स्टोअरवरून तुम्हाला साजेश्या ब्रेसलेटची खरेदी ऑनलाईन खरेदी करू शकता. (Gold Bracelet For Women)

ब्रेसलेट खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्हाला हव्या असलेल्या ब्रेसलेटचे योग्य माप माहिती असायला हवे. योग्य मापाचे ब्रेसलेट असेल तरच तुमच्या हातात ते सुंदर दिसेल. (Gold Bracelet For Women)

ब्रेसलेटच्या साखळ्यांचे विविध प्रकार :

तसेच ब्रेसलेट खरेदी करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते ब्रेसलेट कोणत्या प्रकारे वापरायचं आहे, त्यावरून तुम्ही त्याची साखळी निवडू शकता. तुम्ही जर ब्रेसलेट रोजच्या वापरासाठी घेणार असाल तर त्याची साखळी थोडी जाडसर असायला हवी. ब्रेसलेटच्या साखळ्यांचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला सोनाराकडे पाहायला मिळतील. जसे की, स्नेक चेन, मंकी चेन, केबल चेन इत्यादी. (Gold Bracelet For Women)

ब्रेसलेटची साखळी जितकी महत्त्वाची तितकीच त्याची डिझाईनही महत्त्वाची आहे. तुमच्या ब्रेसलेटच्या मध्यभागी तुम्हाला कोणती डिझाईन हवी ते आधी निश्चित करा. कारण नंतर ती बदलता येत नाही. तुम्ही तुमच्या नावाचं आद्याक्षर ठेऊ शकता किंवा एखादी तुम्हाला आवडलेली डिझाईन मध्यभागी ठेऊ शकता. सोन्याचं ब्रेसलेट हे सोन्याच्या बांगड्या किंवा पाटल्यांपेक्षा कमी किंमतीत तयार होते. तसेच ब्रेसलेट हे तुम्ही कॅज्युअल वेअर किंवा ऑफिशियल वेअरवरही वापरू शकता. (Gold Bracelet For Women)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.