पंजाबमधल्या अमृतसर इथलं सुवर्ण मंदिर (Golden Temple) म्हणजेच गुरुद्वारा हा हरमंदिर साहिब किंवा दरबार साहिब या नावानेही ओळखला जातो. सुवर्ण मंदिर (Golden Temple) हे शीख धर्मीयांचं प्रख्यात आध्यात्मिक स्थळ आहे. कर्तारपूर इथल्या गुरुद्वारा दरबार साहिब आणि ननकाना साहिब तसेच इथल्या गुरुद्वारांसोबतच सुवर्णमंदिर हे शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. मंदिराच्या जागेवर एक पूल बांधलेला आहे. हा पूल १५७७ साली शिखांचे चौथे गुरू, ‘गुरू राम दास’ यांनी बांधला होता. १६०४ साली शिखांचे पाचवे गुरू, ‘गुरु अर्जुन’ यांनी आदिग्रंथाची प्रत सुवर्ण मंदिरात ठेवली होती.
महाराजा रणजित सिंह यांनी शीख समुदायाची स्थापना केल्यानंतर १८०९ साली संगमरवराचा वापर करून सुवर्ण मंदिर (Golden Temple) बांधलं. १८३० साली या सुवर्ण मंदिराचा गाभारा सोन्याच्या पानांनी सजवला गेला. त्यामुळेच या गुरुद्वाराचं नाव सुवर्ण मंदिर असं नाव पडलं.
(हेही वाचा – Delhi – Mumbai Expressway वर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला; एका मजुराचा मृत्यू)
सुवर्ण मंदिर (Golden Temple) हे शीख धर्मियांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचं प्रार्थनास्थळ आहे. सुवर्ण मंदिर हे १८८३ ते १९२० सालच्या दरम्यान सिंह सभा चळवळीचं केंद्र बनलं होतं. त्यानंतर १९४७ ते १९६६ सालादरम्यान पंजाबी सुबा चळवळीचं केंद्र बनलं होतं. १९८४ साली इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’चा भाग म्हणून शीख तरुणांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी पाठवलं. त्यामुळे हजारोंच्या संख्येने सैनिक आणि नागरिकही मरण पावले. तसेच गुरुद्वाराचंही खूप नुकसान झालं आणि अकाल तख्तचं नुकसान झालं. मग पुढे सुवर्ण मंदिर (Golden Temple) गुरुद्वाराचा संपूर्ण परिसर १९८४ सालच्या हल्ल्यानंतर पुन्हा बांधण्यात आला.
सुवर्ण मंदिर (Golden Temple) हे सर्वांसाठी खुले आहे. सुवर्ण मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. तसंच मंदिराच्या सभोवताली तलाव आहे. सुवर्ण मंदिराच्या संकुलामध्ये क्लॉक टॉवर, गुरुद्वारा समितीची कार्यालयं, एक संग्रहालय आणि लंगर भवन यांचा समावेश आहे. लंगर भवन हे शीख समुदायाद्वारे चालवलं जाणारं एक विनामूल्य महाप्रसादगृह आहे. इथे सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या सगळ्या लोकांना भेदभाव न करता शाकाहारी जेवण दिलं जातं. या सुवर्ण मंदिराला (Golden Temple) दरवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त लोक भेट देतात.
(हेही वाचा – Mumbai-Delhi Tunnel Collapse : बांधकाम सुरु असतांनाच कोसळला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील बोगदा; मजूर मृत्यूमुखी)
मुंबईहून सुवर्ण मंदिरापर्यंत कसे पोहोचावे?
मुंबईहून सुवर्णमंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई ते अमृतसरपर्यंत फ्लाइट आणि ट्रेनने प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
अमृतसर हे शहर मुंबईपासून अंदाजे १५५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. मुंबईहून अमृतसरला पोहोचण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे फ्लाइट होय. फ्लाइटने मुंबई ते अमृतसर येथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन तास लागतात.
तर मुंबईहून अमृतसरला पोहोचण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे ट्रेनने होय. ट्रेनमधून प्रवास करून अमृतसर येथे पोहोचण्यासाठी अंदाजे ३१ तास लागतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community