golden temple : का आहे सुवर्ण मंदिर इतकं प्रसिद्ध?

22
golden temple : का आहे सुवर्ण मंदिर इतकं प्रसिद्ध?

श्री हरमंदिर साहिब म्हणजेच सुवर्ण मंदिर (golden temple) हे शीख धर्मातलं सर्वांत पवित्र धार्मिक स्थळ मानलं जातं. हा शीख धर्मियांचा प्रमुख गुरुद्वारा आहे. या सुवर्ण मंदिराला दरबार साहिब किंवा गोल्डन टेंपल असंही म्हटलं जातं. हे सुवर्णमंदिर भारतामध्ये पंजाब राज्यातल्या अमृतसर या शहरामध्ये आहे. हे सुवर्ण मंदिर अमृतसर शहराचं येथील सर्वांत मोठं आकर्षण आहे.

या सुवर्ण मंदिराच्या (golden temple) सभोवतालीच संपूर्ण अमृतसर शहर वसलेलं आहे. भाविक आणि पर्यटक या सुवर्ण मंदिराला हजारोंच्या संख्येने भेट देत असतात. गुरू रामदास यांनी स्वतःच्या हातांनी इथे तलाव बांधलं. या तलावाचं नाव अमृतसर असं आहे. या तलावाच्या नावावरूनच, गुरुद्वाराभोबती वसलेल्या या शहराला अमृतसर असं नाव देण्यात आलं होतं. सुवर्ण मंदिराच्या बाहेरच्या भागावर सोनं मढवलेलं आहे. म्हणूनचं या गुरुद्वाराला ‘सुवर्ण मंदिर’ असंही म्हटलं जातं.

(हेही वाचा – Donald Trump यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा एक्सवर संदेश; म्हणाले, मित्रा…)

सुवर्णमंदिराचं आर्किटेक्चर

सुमारे ४०० वर्षं जुन्या असलेल्या या सुवर्ण मंदिराचा (golden temple) नकाशा, स्वतः गुरु अर्जुन देव यांनी तयार केला होता. हे सुवर्ण मंदिर म्हणजे स्थापत्यशैलीच्या सौंदर्याचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराचं नक्षीकाम आणि बाह्य सौंदर्य पाहण्यासारखं आहे. सुवर्ण मंदिराच्या सभोवताली दरवाजे आहेत. हे दरवाजे चारही दिशांना उघडतात. त्याकाळी अनेक जातींच्या लोकांना अनेक मंदिरांत प्रवेश दिला जात नव्हता. पण या सुवर्ण मंदिराचे चारही दिशांना उघडणारे दरवाजे हे प्रत्येक धर्माच्या आणि जातीच्या अनुयायांचे स्वागत करतात.

सुवर्णमंदिराचा परिसर

सुवर्ण मंदिराच्या संकुलामध्ये दोन मोठी आणि कित्येक लहान तिर्थस्थळं आहेत. ही सर्व तिर्थस्थळं इथल्या सरोवराच्या आजूबाजूला आहेत. हे सरोवर अमृत सरोवर म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण सुवर्ण मंदिर पांढऱ्या संगमरवरी खडकाने बांधण्यात आलं आहे. सुवर्ण मंदिराच्या (golden temple) भिंतींवर सोन्याच्या पानांनी नक्षीकाम केलेलं आहे. सुवर्ण मंदिरामध्ये दिवसभर गुरबानी म्हणजेच गुरुवाणीच्या ध्वनीलहरी ऐकू येतात.

सुवर्ण मंदिराचं बांधकाम अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी नैसर्गिक प्रकाशासाठी सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच शूर शीख सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सुवर्ण मंदिराच्या संकुलामध्ये एक दगडी स्मारकही उभारलेलं आहे.

(हेही वाचा – Imane Khelif : मुष्टियोद्धा इमाने खलीफ पुरुषच असल्याचा वैद्यकीय अहवाल समोर, तिला ऑलिम्पिकमध्ये का खेळू दिलं?)

गुरू रामदास सराय दार

सुवर्ण मंदिराला (golden temple) चार दरवाजे आहेत. त्यांपैकी एक दरवाजा गुरु रामदास सराय यांचा आहे. या दरवाजासमोर अनेक धर्मशाळा आहेत. या धर्मशाळांमध्ये २४ तास लंगर सुरू असते. तिथे कोणीही जाऊन प्रसाद घेऊ शकतो. सुवर्ण मंदिरामध्ये अनेक तिर्थस्थळं आहेत. त्यांपैकीच एक बेरीचे झाड आहे. हे झाड बेर बाबा बुधा म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळी सुवर्ण मंदिराचं बांधकाम सुरू होतं तेव्हा बाबा बुद्धजी या झाडाखाली बसून मंदिराच्या बांधकामावर लक्ष ठेवून होते.

अकाल तख्त

अकाल तख्त हे सुवर्ण मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला आहे. अकाल तख्त हे १६०९ साली बांधण्यात आलं होतं. येथे दरबार भरायचा आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात यायचे. या ठिकाणच्या जवळच शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचं कार्यालय आहे. इथे शीख धर्माशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.