धावपळीची जीवनशैली, आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव, अपुरी झोप…असा अनेक कारणांमुळे हल्ली लठ्ठपणा, वजनवाढ या समस्या उद्भवू लागल्या आहेत. हल्ली बहुतांश लोकांना लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासले आहे. यासाठी सर्व प्रकारचा डाएट, व्यायाम, सकाळी रिकाम्या पोटी हेल्दी ड्रिंक, डिटॉक्स ड्रिंक, ग्रीन टी पिणे…असे विविध प्रकारचे उपाय करताना दिसतात;पण खरंच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? वाचा …याविषयी आहारतज्ज्ञ काय सांगतात.
सकाळी रिकाम्यापोटी गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात, मात्र यामुळे वजनवाढी नियंत्रण येतेच असे नाही, असे आहारातज्ज्ञ सांगतात. गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. शरीरातील चायपचय क्षमता सुधारायला मदत होते. यामुळे शरीरातील मेद कमी व्हायला मदत होते, पण गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होतेच, असे नाही. गरम पाण्याचे जास्त सेवन केल्याने काही वेळा शरीराला अपाय होण्याची देखील शक्यता असते.
(हेही वाचा – Dr. Manmohan Singh : जागतिक राजकारणात भारताची भूमिका योग्यच ; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले कौतुक)
– नियमित गरम पाणी प्यायल्याने अनेक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
– कोमट किंवा गरम पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
– शरीरातील नियमित होणारी चयापचय प्रक्रिया सुधारायला मदत होते. यामुळे शरीरातील मेद जलद गतीने वितळण्यास सुरुवात होते.काही वेळा आहाराच्या वेळा न पाळणे, व्यायाम, आहारात पौष्टिक पदार्थांचा अभाव यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. यावर गरम पाणी परिणामकारक ठरू शकते.
– सकाळी कोमट गरम पाणी प्यायल्याने पोट आणि आतडे उत्तेजित होतात. यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते.
– हल्ली घशाची खवखव होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोमट पाणी प्यायल्याने घसादुखी आणि खवखव या त्रासावर आराम मिळतो.
– शरीर आणि मन शांत होण्यासाठी गरम पाणी प्यायल्याने मदत होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community