रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारलेले आहे. लांबच्या प्रवासासाठी अनेक जण रात्रीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांना प्रवासादरम्यान अधिकाधिक सुविधा देण्यासाठी रेल्वेमार्फत अनेक प्रयत्न केले जातात.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा! मेट्रो प्रवासासह करणार वाहतूक कॉरिडॉरचे उद्घाटन)
रेल्वेचा वेग वाढणार…
आता रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून पुढील दोन वर्षात ट्रेन ४०० सेमी अधिक वेगाने धावणार आहे. १५ ऑगस्ट २०२३ पासून रेल्वे ७५ हून अधिक शहरांशी जोडली जाणार आहे. याचा प्रवाशांना निश्चित लाभ होणार आहे.
बहुतांश रेल्वे स्थानकांवर आता एस्कलेटर सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय रात्री कोणत्याही परिस्थितीत रेल्वेस्टेशन चुकू नये म्हणून एक खास सुविधा रेल्वे घेऊन येत आहे. परंतु या सुविधेसाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे आकारले जाणार आहेत.
डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म (Destination alert wake up alarm) असे या सुविधेचे नाव असून तुम्हाला स्टेशन येण्याआधी २० मिनिटे अलर्ट केले जाणार आहे.
अनेक तक्रारींनंतर सुविधेची योजना
रेल्वे लेट झाली आणि प्रवाशांना झोप लागली तर प्रवाशांना निश्चितस्थळी उतरता येत नाही. यामुळे अनेक तक्रारी रेल्वेकडे आल्या याच पार्श्वभूमीवर ही सुविधा सुरू करण्याची योजना रेल्वेने केली आहे. ज्यांना सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी १३९ क्रमांकावर कॉल करून विचारणा करावी.
प्रवाशांना जेवणाची सुविधा
प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान IRCTC च्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर देता येणार आहे. तुम्ही तिकीट बुक केल्यावर IRCTC कडून तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल.
Join Our WhatsApp Community