गुगल बार्ड VS चॅटजीपीटी; बार्ड का ठरतोय सरस?

275
गुगल बार्ड VS चॅटजीपीटी; बार्ड का ठरतोय सरस?
गुगल बार्ड VS चॅटजीपीटी; बार्ड का ठरतोय सरस?

मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ओपनएआयने चॅटजीपीटीला लाँच केले. लाँचिंगपासून पुढील पाच-सहा दिवसांच्या आत तब्बल पाच दशलक्ष युजर्सनी चॅटजीपीटीचा वापर करून पाहिला होता. त्यामागोमाग या एआयच्या स्पर्धेत इतर बलाढ्य कंपन्या उतरल्या. यात मायक्रोसोफ्ट, गुगल, अलीबाबा यांचा समावेश होतो. फेब्रुवारी २०२३च्या पहिल्या आठवड्यात गुगलने ‘बार्ड’ या एआयची घोषणा केली होती. तेव्हापासून बार्डच्या आगमनाची जगभरातील वापरकर्ते वाट पाहात होते. अखेर प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला तो १० मे २०२३ ला.

तेव्हापासून गुगल बार्ड आणि चॅटजीपीटीची तुलना सुरू झाली. सर्वसामान्य युजर्ससाठी त्या दोघांपैकी कोणता एआय वापरणे जास्त उपयुक्त आहे यावर चर्चा सुरू झाली.

१. अप टू डेट

विचालेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता या दोन्ही एआयकडे आहे. पण सप्टेंबर २०२१नंतरच्या घडामोडींची माहिती चॅटजीपीटीकडे नाही. तर जगभरातली अद्ययावत माहिती बार्डकडे उपलब्ध आहे. उदा. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हा प्रश्न चॅटजीपीटीला विचारला असता तुम्हाला मुख्यमंत्र्यांचे नाव कळणार नाही. चॅटजीपीटी सांगेल की याचे उत्तर इंटरनेटवर शोधावे. मात्र बार्ड याचे अचूक उत्तर सहज देऊ शकेल.

(हेही वाचा – WhatsApp : व्हॉट्सअॅपवर आता एडिट करता येणार Message)

२. इमेजद्वारे उत्तर

चॅटजीपीटी फक्त टेक्स बेस्ड उत्तर देऊ शकते. जर ओपनएआयच्या चॅटबॉटला विचारले की केरळमधील प्रसिद्ध पर्यटक स्थळे कोणती आहेत, तर चॅटजीपीटी एक यादी सादर करेल. मात्र गुगलचा बार्ड तिथल्या प्रदेशांचे फोटोज उत्तराच्या स्वरूपात सादर करेल. अद्याप हे फिचर सर्वसामान्य युजर्ससाठी खुले झालेले नाही.

३. शेअरींग

बार्डने दिलेली उत्तरे त्याच क्षणी शेअर करता येतात. उत्तर मिळाल्यावर तिथे लाईक, डिसलाईक तसेच शेअरचा पर्याय दिसतो. त्यामुळे ते उत्तर जीमेल आणि गुगल डॉक्युमेंट्समध्ये सहज शेअर करता येणार आहे. चॅट जीपीटीमध्ये उत्तर शेअर करण्याचा पर्याय दिसत नाही.

४. व्हॉइस प्रॉम्प्ट

टाईप न करता बार्डला प्रश्न विचारता येईल. व्हॉइस प्रॉम्प्टचा वापर करणे सोपे आहे. मात्र जर चॅटजीपीटीला प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न टाईप करावे लागतो.

५. कोडिंग

गुगलचे बार्ड २०हून अधिक प्रोग्रामिंग भाषांना सपोर्ट करते. फक्त एका लिंकचा वापर करून बार्ड कोणत्याही प्रोग्रामबद्दल माहिती मिळवते. चॅटजीपीटी कोडिंग करण्यात पटाईत आहे. मात्र दिलेल्या लिंकचा प्रोग्राम चॅटजीपीटी समजावून सांगू शकत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.