डॉक्टरांनी लिहिलेले समजेना? आता तुम्हालाही वाचता येतील औषधांची नावे; गुगलने केला दावा

डॉक्टर औषध लिहून देत असलेले अक्षर अनेकदा सामान्य नागरिकांना समजत नाही. डॉक्टरांचे अक्षर समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा अनेकदा अपयश येते. डॉक्टरांचे अक्षर फक्त मेडिकल विक्रेत्यांना समजते परंतु तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही डॉक्टरांचे अक्षर सुद्धा वाचू शकणार आहात, प्रिस्क्रिप्शनवरील अक्षर सामान्य रुग्णांनाही समजणार आहे. यासाठी गुगल एक नवे फिचर लॉंच करणार आहे.

( हेही वाचा : मिशन चांद्रयान ३! इस्त्रोची तयारी पूर्ण, काही महिन्यांत लॉंचिंग )

सामान्य नागरिकांना डॉक्टरांचे अक्षर समजणार; गुगलचा दावा 

गुगल यासाठी अनोखे अ‍ॅप लॉंच करणार आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कितीही खराब, नीटनेटके नसलेले अक्षरही प्रत्येकाला वाचता येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांचे अक्षर आता सामान्यांना सुद्धा समजणार आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर करून आपण अगदी सहजतेने आपल्या दैनंदिन समस्या सोडवू शकतो. गुगलने वापरकर्त्यांसाठी अनेक चांगले फिचर लॉंच केले आहेत यानुसारच आता वापरकर्त्यांना खराब अक्षर कळावे यासाठी एक विशेष अ‍ॅप डिझाईन करण्यात आले आहे. हे नवे अ‍ॅप गुगल लेन्सशी कनेक्ट असू शकते किंवा या अ‍ॅपला इतर सर्च इंजिन जोडले जाऊ शकतात. लवकरच हा नवा अ‍ॅप युजरच्या सेवेत येईल असे गुगलने सांगितले आहे. डॉक्टरांनी लिहिलेले अक्षर अनेकांना समजत नाही परंतु या नव्या फिचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना हे अक्षर समजेल असा दावा गुगलने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here