जागतिक महिला दिनानिमित्त गुगलनं साकारलं अनोखं डुडल!

103

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याचप्रमाणे गुगलने सुद्धा एक विशेष डुडल बनवून महिलांचा खास सन्मान केला आहे. गुगल डुडलने एक अॅनिमेटेड व्हिडिओ बनवला असून या डुडलवर क्लिक केल्यावर जगभरातील विविध संस्कृती दिसू लागतात. या व्हिडिओची सुरुवात एक आई तिच्या लॅपटॉपवर काम करत आणि तिच्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त असते अशी होते त्यानंतर रोपांना पाणी घालणारी स्त्री, हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणारी स्त्री आणि इतर अनेक व्यवसायांमध्ये नेतृत्व करणाऱ्या आणि विविध उपक्रम राबवणाऱ्या स्त्रिया असा हा संपूर्ण व्हिडिओ आहे.

( हेही वाचा : #महिलादिन२०२२ : महिला दिनानिमित्त शिक्षणमंत्र्यानी केले आवाहन! )

जागतिक महिला दिवस

डुडल आर्ट डायरेक्टर ठोका मेर यांनी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे डूडल चित्रित केले. या डुडलमध्ये १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत. या डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी यंदा संयुक्त राष्ट्रांनी ‘जेंडर इक्वॅलिटी’, ‘टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो’ आणि ‘इंटरनेशनल वुमन्स डे’ ने #breakthebias ही थीम ठेवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.