बार्ड पाठोपाठ जगभरातल्या कोट्यवधी युजर्ससाठी गुगलने आणखी एक उपयोगी फिचर लॉन्च केले आहे. या फिचरमुळे नाती घट्ट होतील असा विश्वास गुगल प्रेमींनी व्यक्त केला आहे.
नाते घट्ट करणारे फिचर
बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांचा सर्वाधिक संवाद मेसेजेसवर होतो. पण मनातल्या भावना शब्दबद्ध करण्यात सगळेच यशस्वी होत नाहीत. अनेकदा भावना चांगली असूनही ती पोहोचवण्यासाठी अयोग्य शब्दांचा वापर केल्यामुळे गैरसमज होतात. यासारख्या समस्या गुगलच्या मॅजिक कम्पोजरमुळे संपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जादू कोणावर
मॅजिक कम्पोजरमुळे लिहिलेल्या मेसेजला अधिक प्रभावी प्रकारे मांडता येणार आहे. युजरने मेसेज लिहिल्यावर त्याची वाक्यरचना काही अंशी बदलणे, साजेसे इमोजी अॅड करणे ही कामे मॅजिक कम्पोज चुटकीसरशी करणार आहे.
(हेही वाचा – एलॉन मस्क यांनी मागितली ३५० दशलक्ष युजर्सची माफी)
मेसेज एक, भाषा भिन्न
युजरने टाईप केलेला मेसेज मॅजिक कम्पोज वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. कोणताही मेसेज टाईप केल्यावर तो कोणत्या टोनमध्ये अधिक प्रभावी वाटेल, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य युजरकडे राहणार आहे. एकूण सात प्रकारे मॅजिक कम्पोज मेसेजेस लिहू शकतो.
- रिमिक्स
- एक्साईटेड
- चिल
- शेक्सपियर
- लिरिकल
- फॉर्मल
- शॉर्ट
तारणहार आला रे
या फिचरमुळे अनेकांचे संवाद आतापेक्षा अधिक अर्थपूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे फिचर कधी लवकरात लवकर वापरायला मिळते असे जगभरातली युजर्सला वाटते आहे. मात्र त्यासाठी अजून काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या हे फिचर फक्त अमेरिकेतील युजर्ससाठी खुले करण्यात आले आहे. लवकरच भारतातील युजर्सना मॅजिक कम्पोज वापरता येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community