सध्या प्रवासात रस्ते शोधण्यासाठी गुगल मॅपसह इतरही काही अॅप्सचा वापर करण्यात येतो. यामध्ये चांगल्या व्ह्यूसाठी Google ने Street View App युजर्ससाठी आणले होते. पण आता हेच अॅप बंद करण्याची घोषणा गुगलच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
गुगलची घोषणा
Google Street View App हे येत्या 21 मार्च 2023 पर्यंतच सुरू राहणार आहे. त्यानंतर हे अॅप बंद करण्यात येईल अशी घोषणा गुगलकडून करण्यात आली आहे. 9To5Google नुसार गुगलने या अॅपचे अनेक शटडाऊन मेसेज तयार केले आहेत. या मेसेजच्या माध्यमातून स्ट्रीट व्ह्यू अॅप वापरणा-या युजर्सना अॅप बंद होण्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. अँन्ड्रॉईड आणि iOS वर सध्या हे अॅप उपलब्ध आहे. स्ट्रीट व्ह्यू सोबतच या अॅपच्या माध्यमातून गुगल मॅपवर ठिकाणे सर्च करण्याची परवानगीही देण्यात येते.
(हेही वाचाः Google ने प्ले स्टोअरवरुन हटवली ही 13 Apps, तुमच्या फोनमध्येही असतील तर डिलीट करा)
गुगलने हटवली अॅप्स
McAfee Mobile Research Teamच्या रिसर्च टीमने या अॅप्सच्या बाबत आपला रिपोर्ट संबंध केला होता. त्यामध्ये या अॅप्स संदर्भात रिपोर्ट देखील करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत गुगलने या अॅप्सना प्ले स्टोअर वरुन हटवले आहे. ग्राहकांच्या मोबाईलवर ही अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये रन होत असून त्यामुळे बॅटरी लो होणं आणि ग्राहकांची खाजगी माहिती चोरणं असे प्रकार घडत होते. यामुळे फसवणूक टाळण्यासाठी गुगलने ही कारवाई केली आहे.
Join Our WhatsApp Community