गुगल हे असं सर्च इंजिन आहे, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण वापरत असतात. आपल्या मनात एखादा प्रश्न आला किंवा एखादा अर्थ जाणून घ्यायचा असेल, अधिक माहिती कशासंदर्भात जाणून घ्यायची असेल तर गुगल हे सर्च इंजिन आपल्या गुरूप्रमाणे कार्य करत असते. यंदा मे मध्ये, गुगलने घोषणा केली की, ज्याप्रमाणे युजर्स आपल्या गुगल अकाऊंटवर लॉगिन करत होते, त्यात आता २०२१ च्या अखेरपर्यंत बदल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता सर्व युजर्ससाठी Two Step Verification द्वि-चरण सत्यापन प्रक्रिया अनिवार्य केले जाणार आहे. ९ नोव्हेंबरपासून, सर्व गुगल युजर्सना त्यांच्या अकाऊंटवर लॉग इन करताना टू स्पेप व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. हा एक मोठा बदल असून तो युजर्सच्या सुरक्षिततेसंदर्भातील असेल असे सांगितले जात आहे.
असा असेल नवा बदल
एकदा टू स्पेप व्हेरिफिकेशन हा पर्याय अनेबल केल्यावर, युजर्स केव्हाही त्यांचे गुगल अकाऊंट लॉग इन करतील तेव्हा त्यांना एसएमएस किंवा ओटीपीसह ईमेल येईल. युजर्स ज्यावेळी लॉग इन करतील त्यावेळी त्यांना ओटीपी टाकणं आवश्यक असणार आहे. जो प्रत्येक वेळी युजर्सला लॉग इन करताना वेगवेगळा मिळत असतो. हा युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्सनल डेटा देखील सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.
(हेही वाचा- मुंबईकरांनो कारमध्ये बसून भव्यस्क्रिनवर चित्रपट पाहण्यासाठी सज्ज व्हा !)
असे करता येणार टू स्पेप व्हेरिफिकेशन
- स्टेप 1: तुमचे गुगल अकाऊंट उघडा
- स्टेप 2: नेव्हिगेशन पॅनेलमध्ये, प्रायव्हसी हा पर्याय निवडा
- स्टेप 3: गुगलमध्ये साइन इन करण्याच्या पर्यायाखाली, टू स्टेप व्हेरिफिकेशन निवडा
- स्टेप 4: ऑन-स्क्रीन स्टेप फॉलो करा.