Google Pixel 9a : गुगल पिक्सेल ९ए भारतात लाँच; ४९,९९९ रुपये किंमत

Google Pixel 9a : गुगल पिक्सेल ९ए ची वैशिष्ट्य काय?

54
Google Pixel 9a : गुगल पिक्सेल ९ए भारतात लाँच; ४९,९९९ रुपये किंमत
  • ऋजुता लुकतुके

टेक कंपनी गुगलने या आठवड्यात भारतासह जागतिक बाजारपेठेत पिक्सेल ९ए स्मार्टफोन लाँच केला. हे कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज पिक्सेल ए हे परवडणारे व्हर्जन आहे आणि ॲपलच्या आयफोन १६ई शी स्पर्धा करण्यासाठी लाँच करण्यात आले आहे. (Google Pixel 9a)

या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह फक्त एकच फोन लाँच केला आहे. त्याची किंमत ४९,९९९ ठेवण्यात आली आहे. गुगल ७ वर्षांसाठी फोनवर सपोर्ट देईल. यात ओएस अपडेट्स, सिक्युरिटी अपडेट्स, फीचर ड्रॉप्स आणि एआय इनोव्हेशन्स मिळतील. (Google Pixel 9a)

पिक्सेल ९ मालिकेतील हा फोन अनेक एआय वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. यामध्ये जेमिनी एआय, जेमिनी लाईव्ह, पिक्सेल स्टुडिओ, सर्कल टू सर्च, एआय वेदर समरी आणि कॉल नोट्स यांचा समावेश आहे. तथापि, पिक्सेल स्क्रीनशॉट सारखी काही वैशिष्ट्ये त्यात कमी उपलब्ध असतील. (Google Pixel 9a)

(हेही वाचा – World Climate Day : बदलत्या हवामानामुळे ऋतुचक्र बदलणार! )

फोनचा डिस्प्ले ६.३ इंचाचा आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२०० नीट्चा आहे. या फोनमध्ये ४८ मेगा पिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. १२ मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. मुख्य कॅमेरात ८ एक्स झूम असेल. अँड्रॉईड १५ प्रणालीवर आधारित हा फोन आहे आणि प्रोसेसर गुगलनेच बनवलेला टेन्सर जी४ टायटन हा आहे. फोनची बॅटरी ५००० एमएएच अशी तगडी आहे. आणि फोनबरोबर ४५ वॅट्सचा वायरलेस चार्जरही देण्यात आला आहे. (Google Pixel 9a)

तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जिबींचं स्टोरेज असा एकच प्रकार लाँच करण्यात आला आहे. यात पर्याय देण्यात आलेला नाही. या फोनचं वजन फक्त १९९ ग्रॅम इतकं आहे. हा फोन ४९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (Google Pixel 9a)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.