ओ वुमनिया! ‘या’ चार शहरात उघडणार लेडीज स्पेशल वाईन शॉप!

आतापर्यंत तुम्ही पुरूषांसाठी वाईन शॉप असल्याचे ऐकले असेल किंवा पाहिले असेल…परंतु तुम्हाला महिलांसाठी स्पेशल वाईन शॉप असल्याचे माहित आहे का? मद्यविक्री वाढवण्यासाठी मध्यप्रदेशच्या सरकारने जबरदस्त फंडा शोधून काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एप्रिल 2022 पर्यंत मध्यप्रदेशात खास महिलांसाठी असणारे वाईन शॉप तुम्हाला बघायला मिळतील. राज्यातील या चार प्रमुख शहरांमध्ये पहिल्यांदाच या निमित्ताने ओ वुमनियाचा’ प्रयोग होणार असून तेथे वुमन वाईन शॉप उघण्यात येणार आहे. हे अतिश्योक्ती वाटत असले तरी हे खऱं आहे.

सरकारी तिजोरी भरण्यासाठी वुमन वाईन शॉप

मध्य प्रदेश राज्यात उमा भारतीसारख्या फायरब्रँड महिला नेत्या दारू विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळाले होते, असे असले तरीही महसूल उत्पन्ना वाढवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारदेखील तितकेच आग्रही आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार महिलांसाठीचे वाईन शॉप उघडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचा – एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण कठीण! शरद पवारांचे मत)

‘या’ चार शहरात स्पेशल वाईन शॉप होणार

सर्व प्रथम मध्य प्रदेश सरकार राज्यातील चार महानगरांमध्ये महिलांसाठीचे खास वाईन शॉप उघडणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई अशा मेट्रो सिटीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. या दुकानांमध्ये महिलांसाठीच्या सर्व ब्रँडची वाईन उपलब्ध करण्यात येणार असून या चार शहरांमध्ये भोपाळ, जबलपूर, इंदौर आणि ग्वाल्हेर अशा चार शहरांचा समावेश असणार आहे. याठिकाणी केवळ महिलांसाठी, महिलांना आवडणारी मद्यविक्री करण्यात येणार आहे.

सरकारतर्फे महिलांची काळजी घेणार

असे सांगितले जात आहे की, येत्या एप्रिल महिन्यापर्यंत ही वुमन वाईन शॉप तयार करण्यात येणार आहे. महिलांना त्यांची सुरक्षिता जपून वाईनचा आनंद घेता यावा यासाठी मध्य प्रदेश सरकारतर्फे विशेष काळजी घेतली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here