सरकार ‘राष्ट्रीय पर्यटन धोरण’ लागू करणार; युवा पर्यटन क्लब स्थापन करण्याचे आवाहन

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय पर्यटन धोरण आणण्याच्या तयारीत आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे विविध राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हरियाणा, मिझोराम, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, आणि हिमाचल प्रदेश या 12 राज्यांचे पर्यटन मंत्री उपस्थित होते.

( हेही वाचा : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी – बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर)

पर्यटनाच्या दृष्टीने भारत एक समृद्ध देश आहे. समृद्ध वारसा आणि जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या भारतात सण, धर्म,परंपरा आणि चालीरीतींचा सर्वांगीण संगम पाहायला मिळतो. भारताला विकसित राष्ट्र म्हणून दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटन क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे रेड्डी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन पैलूंवर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पहिला म्हणजे सरकारी कामकाजातील समग्र दृष्टिकोन. विविध मंत्रालयांमधील परस्पर कार्यालयीन सीमारेषा पुसून संबंधित सर्व सरकारी मंत्रालये समग्र दृष्टिकोनातून समन्वायाने काम करतो. दुसरे म्हणजे सांघिक भावना. नागरिकांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करणे, असे रेड्डी यांनी सांगितले.

रेल्वेवर 62 हजार कोटी तर रस्ते जोडणीवर 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार

रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार देशभरातील पर्यटन क्षेत्रांना जोडण्यासाठी रेल्वेवर 62 हजार कोटी रुपये आणि रस्ते जोडणीवर 80 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. पर्यटन विकासाच्या दृष्टीनं, पर्यटन स्थळं एकमेकांशी हवाई मार्गानं जोडली जाणं किती महत्त्वाचं आहे यावरही किशन रेड्डी यांनी भर दिला. 2014 साली देशात 74 विमानतळ होते, तर आता 140 आहेत असं सांगत ते म्हणाले की 2025 वर्षापर्यंत ही संख्या 220 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

युवा पर्यटन क्लब

एनएसएस आणि एनसीसीप्रमाणेच युवा पर्यटन क्लब सर्व स्तरावर स्थापन करण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले. या पर्यटन क्लबच्या स्थापनेसाठी राज्यांनी युद्धपातळीवर काम करणे आवश्यक आहे. या माध्यमातून तरुणांना ‘देखो अपना देश’ या संकल्पनेची ओळख करून देता येईल. पर्यटनाची खरी क्षमता साध्य करण्यासाठी प्रत्येक स्तरावर समन्वय सुनिश्चित करणे ही सर्वात मूलभूत गरज असल्यावर रेड्डी यांनी भर दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here