100 दिव्यांग लाभार्थींना मिळाले कृत्रिम हात

163

महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली स्वयंसेवी संस्था ग्रँड मराठा फाउंडेशन ने इनालि फाउंडेशनसोबत दिव्यांगांना कृत्रिम हात मोफत पुरविण्यासाठी सहकार्य केले. या उपक्रमांतर्गत 16 ते 60 वर्षे या वयोगटातील 100 दिव्यांग लाभार्थींना कृत्रिम हात मोफत पुरविण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्टया स्वतंत्र व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे.

विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वंचितांचे सबळीकरण करण्याचे ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय असून इनालि फाउंडेशनने दिव्यांगांना कृत्रिम हात पुरवून केलेल्या सहयोगामुळे त्यांच्या ध्येयपूर्तीच्या वाटचालीत मदत होणार आहे. रोहित शेलटकर (संस्थापक, जीएमएफ), माधवी शेलटकर (विश्वस्त, जीएमएफ) आणि प्रशांत गाडे (संस्थापक, इनालि फाउंडेशन) यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

(हेही वाचा- जनाब राऊत तुम्हाला नवाब मलीकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय, चित्रा वाघ यांचा आरोप)

या उपक्रमाविषयी माहिती देताना चित्रपट निर्माते आणि ग्रँड मराठा फाउंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर म्हणाले, “इनाली फाउंडेशनसोबत एकत्रितपणे राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत १०० दिव्यांग व्यक्तींना मदत तर मिळालीच पण त्यामुळे मर्यादित स्रोत व संसाधने असलेल्या व्यक्तींचे सबळीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट अधिक भक्कम झाले आहे. कृत्रिम हातामुळे लाभार्थी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वावलंबी आयुष्य जगू शकतात”.

या सहयोगाबद्दल मत व्यक्त करताना इनालि फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत गाडे म्हणाले, “दैनंदिन कामे करण्यासाठी दिव्यांगत्वाला सक्षमतेमध्ये परिवर्तीत करण्यावर आमचा विश्वास आहे. गरजूंना मदत करण्याच्या समान उद्दिष्टासह ग्रँड मराठा फाउंडेशनसोबत या उपक्रमासाठी सहयोग करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.”

मर्यादित आर्थिक स्रोत असलेल्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांगांनी पुढे यावे आणि फाउंडेशनशी जोडले जाऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रँड मराठा फाउंडेशनतर्फे करण्यात येत आहे. तसेच ‘गरजूंचे सबळीकरण’ या कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://grandmaratha.org/ या वेबसाइटला भेट द्यावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.