जगभरातील ग्राफिक्स डिझाईनरच्या नोकऱ्या धोक्यात? काय आहे AI Image Generator जाणून घ्या…

348

प्रत्येक गोष्टीत अलिकडे आपण शॉर्टकट शोधत असतो, इंग्रजी मजकूर गुगलमधून ट्रान्सलेट करण्यापासून ते अ‍ॅलेक्सा माझ्या आवडीचे गाणे लाव अशी सर्व कामे अगदी सोयीस्कर करण्यासाठी आपण आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. AI ( Artificial Intelligence ) इमेज क्रिएटर हे आधुनिक तंत्रज्ञान मिडजर्नी रिसर्च लॅब सारख्या काही संस्थांनी तयार केले आहे. या नव्या तंत्रज्ञानाद्वारे सामान्य नागरिकांना हव्या त्या इमेज क्रिएट करता येतील आणि यामुळे जगभरातील अनेक नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, कारण AI इमेज क्रिएटरमुळे तुम्हाला सर्चमध्ये टाइप करून हव्या त्या इमेज प्राप्त होऊ शकतात. या तंत्रज्ञानाद्वारे पृथ्वीवरचा शेवटचा सेल्फि कसा असेल याची देखील इमेज क्रिएट करण्यात आली होती.

New Project 21 1

( हेही वाचा : मराठी माणसाने रचना केलेल्या Pincode ची गोष्ट! ६ अंकी पिनकोडचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? )

सध्या आपल्याला कोणतीही इमेज हवी असल्यास आपण संबंधित ग्राफिक्स डिझाईनरकडे आपल्या मनातील चित्र रंगवून अशी इमेज हवी आहे किंवा फोटोमध्ये काही करेक्शन असल्यास आपण ग्राफिक्स डिझाईनरची मदत घेतो. परंतु AI मुळे नागरिक घरबसल्या अगदी एका क्लिकवर संपूर्ण इमेज क्रिएट करू शकतात. एआय इमेज जनरेटरद्वारे वापरकर्त्याने केलेल्या वर्णनावरून वास्तववादी प्रतिमा तयार होऊ शकते. या तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या इमेज केवळ आपल्या कल्पनाशक्तीद्वारे तयार होतात. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी तुम्हाला खालील गोष्टी फॉलो कराव्या लागतील.

  • तुम्हाला तुमचे डिसकॉर्ड खाते तयार करावे लागेल.
  • Midjourney.com वर जा आणि बीटा साठी साइन अप करा.
  • तुम्ही तुमचे Discord खाते लिंक केल्यानंतर, मिडजॉर्नी सर्व्हरवर नेव्हिगेट करा आणि “Newbie” बॉट चॅनेल शोधा.
  • चॅनेलमध्ये – /imagine टाइप करा आणि नंतर जे काही तुम्ही कल्पना करू शकता. संदेश पाठवा आणि बॉट तुम्हाला चार प्रतिमा पाठवेल यासाठी 60 सेकंद प्रतीक्षा करा.
  • यानंतर तुम्हाला अपेक्षित इमेज प्राप्त होतील.

नोकऱ्या धोक्यात कशामुळे येतील याची प्रमुख कारणे कोणती आहेत?

  • Artificial Intelligence या तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही अगदी सर्व कामे सहज करू शकता.
  • मुद्रित नकाशे किंवा दिशानिर्देशांवर अवलंबून राहण्याऐवजी नागरिक Waze, Google किंवा Apple Maps वापरतात. आता AI तंत्रज्ञान वापरून नकाशावर चांगले व्हिज्युअल, घर आणि इमारत क्रमांक ओळखणे आणि समजणे सहज शक्य होईल.
  • AI तंत्रज्ञान तुमचे डिजिटल सहायक बनेल, उदाहरणार्थ गाडी चालवताना तुम्ही तुमच्या नातेवाईकांना कॉल लावा असे या तंत्रज्ञानाला सांगू शकता. Alexa, siri आपम AI वापरू शकतो. AI मुळे वैयक्तिक डिजिटल सहायक बनेल त्यामुळे यासाठी आता स्वतंत्र व्यक्तीला कामावर ठेवणे गरजेचे नाही.
  • AI अल्गोरिदम किवर्ड आयडेंटिफिकेशन आणि व्हिज्युअल इमेज Recognition द्वारे अटी आणि शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या समस्याग्रस्त पोस्ट शोधू शकतात म्हणजेच सोशल मिडीया वापरणं अधिक सुरक्षित होईल यासाठी कंपन्यांना स्वतंत्र हेल्प डेस्क कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही.
  • AI चा फायदा घेऊन बॅंकेत ठेवी ठेवणे, पैसे हस्तांतरित करणे, बॅंक खाती उघडणे शक्य आहे तसेच AI तुमच्या मनोरंजनाची सुद्धा जबाबदारी स्वीकारेल उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या लंच ब्रेकवर असताना तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवणे अशी सर्व कामे या तंत्रज्ञानामुळे होत असल्याने माणसाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.