‘या’ वेळेस चुकूनही पिऊ नका Green Tea, फायद्याऐवजी होईल तोटा!

127

तुम्ही चहा पिण्याचे शौकिन आहात का? किंवा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात का? देशात दूधाचा चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, पण तो प्यायल्याने आरोग्याला खूप हानी होते, असे अनेकजण सांगतात. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञ आरोग्यास अनेकदा ग्रीन टी हा उत्तम पर्याय असल्याचे सांगतात. ग्रीन टी, हर्बल टी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते, तसेच आपल्या त्वचेला आणि केसांना खूप फायदा होतो. मात्र, ग्रीन टीचे सेवन करतानाही खबरदारी घेणे तितकंच आवश्यक आहे, कोणत्याही वेळेस ग्रीन टी पिल्यास फायद्याऐवजी तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

यावेळी चुकूनही ग्रीन टी पिऊ नका

1. सकाळी उपाशी पोटी

जर तुम्ही रोज सकाळी उठून काहीही न खाता ग्रीन टी प्यायलात आणि त्यामुळे वाढणारे वजन कमी होईल असा समज करत असाल, तर ते चूकीचे आहे. हर्बल टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल हे घटक असतात ते शरीरातील गॅस्ट्रिक ऍसिड वाढवतात. त्यामुळे रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायलात इनडाइजेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे ग्रीन टी पिण्याआधी काहीतरी खाणं गरजेचं आहे.

(हेही वाचा – तुम्ही चहाचे शौकिन आहात? तर चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी)

2. रात्री झोपण्यापूर्वी

रात्री ग्रीन टी प्यायल्यानंतर तुम्हाला झोपण्याची सवय असेल तर लवकरात लवकर ती सवय बदला, कारण या चहामध्ये असलेले कॅफिन मेलाटोनिन हार्मोन (Melatonin Hormone) स्रवण्यास अडचणी निर्माण करते. या हार्मोनमुळे झोप येण्यासाठी मदत होते, म्हणून रात्री ग्रीन टी पिऊ नये.

3. जेवण केल्यानंतर…

जर तुम्हाला वाटत असेल की जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होईल, तर हा तुमचा भ्रम आहे. खरं तर, तुम्ही जेवल्यानंतर लगेच ग्रीन टी प्यायला, तर अन्नातील पोषक तत्वांच्या शोषणात समस्या निर्माण होतात त्यामुळे जेवण केल्यानंतर शक्यतो ग्रीन टी पिणं टाळा.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

ग्रीन टी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्यायले तर नुकसान देखील नक्कीच आहे. त्यामुळे हा चहा दिवसातून 3 वेळेपेक्षा जास्त पिऊ नये. ग्रीन टी जेवणानंतर एक तास आणि जेवणाच्या एक तास आधी प्यायला पाहिजे, तरच तुम्हाला या हर्बल टीचे फायदे मिळू शकतात, असे सांगितले जाते.

(वरील दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.