
गृहप्रवेश हा सनातन हिंदू परंपरेतला एक महत्त्वाचा विधी आहे. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी समृद्धी, आनंद आणि शांती टिकून राहण्यासाठी लोक गृहप्रवेशाकरिता शुभ मुहूर्त शोधतात. वास्तुशास्त्र आणि हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार अनुकूल मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदते आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांना यश मिळतं. (griha pravesh)
(हेही वाचा – diploma in mechanical engineering : करिअरची जबरदस्त संधी! मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा करा आणि कमवा लाखो रुपये)
हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२५ साली सर्वात शुभ गृहप्रवेश तारखा खालीलप्रमाणे आहेत :
जानेवारी २०२५
जानेवारी महिन्यात गृहप्रवेशासाठी कोणताही शुभ दिवस नाही. म्हणून पुढच्या महिन्याची वाट पाहणे योग्य ठरेल.
फेब्रुवारी २०२५
- ६ फेब्रुवारी – गुरुवार : दशमी, रोहिणी नक्षत्र – रात्री १०.५३ ते सकाळी ०७.०६ (७ फेब्रुवारी)
- ७ फेब्रुवारी (शुक्रवार) : दशमी, एकादशी, मृगशीर्ष नक्षत्र – सकाळी ७:०६ ते सकाळी ७:०५ (८ फेब्रुवारी)
- १४ फेब्रुवारी (शुक्रवार) : तृतीया, उत्तर फाल्गुनी नक्षत्र – रात्री ११.०९ ते सकाळी ०६.५९ (१५ फेब्रुवारी)
मार्च २०२५
- १ मार्च (शनिवार) : द्वितीया, तृतीया, उत्तर भाद्रपद नक्षत्र – सकाळी ११:२२ ते सकाळी ६:४५ (२ मार्च)
- ५ मार्च (बुधवार) : सप्तमी, रोहिणी नक्षत्र – सकाळी १:०८ ते सकाळी ६:४१ (६ मार्च)
एप्रिल २०२५
- ३० एप्रिल (बुधवार) : तृतीया, रोहिणी नक्षत्र – सकाळी ०५.४१ ते दुपारी ०२.१२
मे २०२५
- १ मे (गुरुवार) : पंचमी, मृगशीर्ष नक्षत्र – सकाळी ११.२३ ते दुपारी ०२.२१
- ७ मे (बुधवार) : एकादशी, उत्तर फाल्गुनी नक्षत्र – संध्याकाळी ०६.१७ ते सकाळी ०५.३५ (८ मे)
- १७ मे (शनिवार) : पंचमी, उत्तराषाद नक्षत्र – संध्याकाळी ०५.४४ ते सकाळी ०५.२९ (१८ मे) (griha pravesh)
(हेही वाचा – National Herald ला दिलेली जमीन शासनाने परत घ्यावी; मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी)
जून २०२५
- ४ जून (बुधवार) : दशमी, उत्तर फाल्गुनी नक्षत्र – रात्री ११.५४ ते दुपारी ०३.३५ (५ जून)
- ६ जून (शुक्रवार) : एकादशी, चित्रा नक्षत्र – सकाळी ०६.३४ ते सकाळी ०४.४७ (७ जून)
(जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये गृहप्रवेश करण्यायोग्य कोणत्याही शुभ तारखा नाहीत.)
ऑक्टोबर २०२५
- २३ ऑक्टोबर (गुरुवार) : तृतीया, अनुराधा नक्षत्र – सकाळी०४.५१ ते सकाळी ०६.२८ (२४ ऑक्टोबर)
- २९ ऑक्टोबर (बुधवार) : सप्तमी, उत्तर आषाढ नक्षत्र – सकाळी ०६.३१ ते सकाळी ०९.२३
नोव्हेंबर २०२५ मध्ये
- ३ नोव्हेंबर (सोमवार) : त्रयोदशी, उत्तर भाद्रपद नक्षत्र – सकाळी ०६.३४ ते दुपारी ०२.०५ (४ नोव्हेंबर)
- १४ नोव्हेंबर (शुक्रवार) : दशमी, एकादशी, उत्तर फाल्गुनी नक्षत्र – रात्री ०९.२० ते सकाळी ०६.४४ (१५ नोव्हेंबर)
डिसेंबर २०२५
- १ डिसेंबर (सोमवार) : एकादशी, रेवती नक्षत्र – सकाळी ०६.५६ ते संध्याकाळी ०७.०१
- ५ डिसेंबर (शुक्रवार) : प्रतापदा, द्वितीया, रोहिणी नक्षत्र – सकाळी ०६.५९ ते सकाळी ०७.०० (६ डिसेंबर) (griha pravesh)
गृहप्रवेश करण्यासाठीचा मुहूर्त खालील गोष्टींचा विचार करून गणला जातो :
- तिथी (चंद्रदिन) – काही तिथी शुभ मानल्या जातात.
- नक्षत्र (चंद्रमनन) – गृहप्रवेश २०२५ साठी सर्वोत्तम नक्षत्रांमध्ये रोहिणी, मृगशीर्ष आणि अनुराधा यांचा समावेश आहे.
- आठवड्याचे दिवस – सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार यांना प्राधान्य दिलं जातं.
- पंचांग विश्लेषण – वैयक्तिक मुहूर्तासाठी ज्योतिषाचा सल्ला घेणं योग्य ठरतं. (griha pravesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community