अरे देवा…आता कपडे, चपलाही महागणार!

97

पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना, आता येत्या वर्षात कपडे व चपलांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. यापूर्वी कपडे आणि चप्पल यांवर सरकार 5 टक्के जीएसटी दर आकारत होते मात्र येणाऱ्या नवीन वर्षापासून नवे दर लागू करत जीसटी दर 12 टक्के करण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने (CBIT) केली आहे.

12 टक्के जीएसटी

नवीन घोषणेनुसार फॅब्रिक किंवा धाग्यावरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. तसेच तयार ड्रेसवर 12 टक्के जीएसटी आकारला जाईल. याआधी ज्यांच्या किमती 1 हजार रुपयांपर्यंत होत्या, अशाच कपड्यांवर 5 टक्के जीएसटी होता. आता सर्व ड्रेसेसचा 12 टक्के यादीत समावेश करण्यात आला आहे.

( हेही वाचा: भांडुप नवजात बालमृत्यू प्रकरण: सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, भाजपची मागणी )

कपडे व्यापारी संघटना नाराज

सरकारच्या या निर्णयावर ‘क्लॉथिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (CMAI) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कच्चा माल आणि मालवाहतूकीच्या खर्चात झालेली वाढ यामुळे या उद्योगाला आधीच अडथळे येत असताना, या दरवाढीच्या निर्णयामुळे कापड उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच कपडे व्यापारावर कोरोनामुळे परिणाम होऊन व्यापाऱ्यांना नुकसान झाले असे मत (CMAI) संघटनेने व्यक्त केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.