गुढी पाडवा हा सण कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीचा दिवस आहे. चंद्र दिनदर्शिकेनुसार महाराष्ट्रात हा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. “गुढी पाडवा” हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्रकलेच्या तेजस्वी टप्प्याचा पहिला दिवस होय. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढी पाडवा साजरा केला जातो. (gudi padwa wishes in marathi)
महाभारताच्या आदिपर्वामध्ये असा उल्लेख आहे की, उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि दुसर्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी त्या काठीची पूजा केली. ही परंपरा म्हणून इतर राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र बांधून, तिला सजवून, तिची पूजा करतात. (gudi padwa wishes in marathi)
(हेही वाचा – Weather Update: राज्यात होळी आधीच जाणवू लागल्या उन्हाच्या झळा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? वाचा )
याव्यतिरिक्त ब्रह्मदेवाने याच दिवशी हे जग निर्माण केलं असं म्हटलं जातं. त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी गुढीची पूजा केली जाते आणि सर्वत्र या हिंदू नववर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी शोभायात्रा काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ सजवण्यात येतात. या चित्ररथांच्या माध्यमातून समाजाला आणि नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यात येते. (gudi padwa wishes in marathi)
यादिवशी सगळे लोक एकमेकांना नववर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यांपैकी काही शुभेच्छा संदेश आम्ही खाली दिले आहेत. हे संदेश पाठवून तुम्ही तुमच्या आप्तजनांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता… (gudi padwa wishes in marathi)
(हेही वाचा – Crime : आई आणि आजीनेच केली १७ वर्षांच्या मतीमंद मुलीची हत्या)
- श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
तुमचं नववर्ष होवो छान।
नूतन वर्षाभिनंदन! - वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने अधुरी नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! - निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळ-साखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा… - नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
जसे सुगंधी चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !! (gudi padwa wishes in marathi)
(हेही वाचा – ९९ हजार पात्र फेरीवाले असतांना मतदारयादीत २२ हजारच कसे; Bombay High Courtची विचारणा)
- सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श।
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी।
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! - चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
नववर्षाची सुरवात घेऊन,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन! (gudi padwa wishes in marathi)
(हेही वाचा – Pune-Karnataka Bus सेवा बंदच; सीमेवरील नागरिकांना फटका)
- नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..
सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..
हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी.. - आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला..
चला करू पुन्हा नव्याने सुरूवात
एका चैतन्याच्या अध्यायाला..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.. - नूतन वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
हे वर्ष तुमच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो
हीच ईश्वर चरणी सदिच्छा..! (gudi padwa wishes in marathi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community