गुजिया (gujiya) हा खवा, साखर, सुकामेवा आणि सुक्या नारळापासून बनवलेल्या गोड पदार्थांनी भरलेला तळलेला कुरकुरीत पदार्थ आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात गुजिया हा पदार्थ अनेक नावांनी ओळखला जातो. गुजरात राज्यात त्यांना ‘घुघरा’ असं म्हणतात. तर महाराष्ट्रात ती ‘करंजी’ म्हणून ओळखली जाते. तसंच आंध्र प्रदेशात गुजियाला ‘काजिकलायू’ या नावाने ओळखतात. तर गोव्यामध्ये ती ‘नेवरी’ या नावाने लोकप्रिय आहे आणि तामिळनाडू येथे ‘कराचिका’ अशा वेगवेगळ्या नावांनी गुजिया भारतभर ओळखली जाते. जरी या पदार्थाचं नाव आणि त्यासाठी वापरलेलं स्टफिंग राज्यानुसार वेगवेगळं असलं तरीही त्याचं आकर्षण संपूर्ण भारतात सारखंच आहे.
गुजिया (gujiya) कुरकुरीत झाल्या तर खायला खूप मजा येते. पण मऊ झाल्या तर सगळा मुडच खराब होतो. पण तुमचा मड अजिबात खराब होऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला गुजिया कुरकुरीत कशा करायच्या त्याबद्दल पाच खास टिप्स सांगणार आहोत. त्या कोणत्या टिप्स आहेत ते पाहुयात..
हलवायाकडे मिळणाऱ्या अगदी कुरकुरीत, फ्लॅकी गुजियांसारख्याच गुजिया तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता. गुजिया जास्त कुरकुरीत बनवणं इतकं कठीण नाही. गुजिया (gujiya) कुरकुरीत कशा बनवाव्यात ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
(हेही वाचा – pm surya ghar muft bijli yojana चे तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा)
रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करा
गुजियाचं (gujiya) बाह्य कवच कुरकुरीत करण्यासाठी, फक्त मैद्यावर अवलंबून राहू नका. तर मैद्यामध्ये थोडासा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला. रव्यामुळे गुजियाचं कवच नाजूक, दाणेदार कुरकुरीत होईल आणि तांदळाच्या पिठामुळे कवच हलके आणि कुरकुरीत होईल. परफेक्ट माप घ्यायचं असेल तर तीन भाग मैदा आणि एक भाग रवा किंवा तांदळाचं पीठ घ्या. एवढा साधा बदल केल्याने तुमच्या गुजियाला एक परिपूर्ण आणि कुरकुरीत पोत मिळेल.
योग्य प्रमाणात तूपाचा वापर करा
तुप हे तुमच्या गुजियाला (gujiya) कुरकुरीत किंवा कडक बनवतं. तरीही जर तुम्ही जास्त तूप वापरलं तर त्यामुळे गुजिया कुरकुरीत होतात. तेल जर कमी घातलं तर गुजिया कडक होतील. तुम्हाला परफेक्ट माप हवं असेल तर, एक कप मैद्यासाठी २ चमचे तूप वापरा. त्यामुळे ब्रेडक्रम्सरखा पोत तयार होईल. तो तयार होईपर्यंत हाताने आणि बोटांनी पीठामध्ये तूप घुसळून घ्या. असं केल्यामुळे गुजिया दिवसभर कुरकुरीत राहतील.
(हेही वाचा – Budget Session : मविआचा सभापती-अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप; विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन)
योग्य जाडसरपणा
तुम्ही तयार केलेल्या गुजियाच्या (gujiya) कवचाची जाडीसुद्धा गुजिया कुरकुरीत होण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. जर पीठ खूप जाड ठेवलं असेल तर गुजिया कुरकुरीत होण्याऐवजी पिठूळ होईल आणि जर ते खूप पातळ असेल तर, गुजिया तळताना तुटू शकतात. गुजियाच्या कवचाची जाडी साधारणपणे २ ते ३ मिमी एवढी ठेवा. तसं केल्याने गुजिया सुंदर आणि कुरकुरीत होतील.
एक्स्ट्रा क्रंच येण्यासाठी डबल फ्राय करा
गुजिया (gujiya) नेहमीपेक्षा जास्त कुरकुरीत व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्ही ही डबल-फ्राय पद्धत अवलंबून पाहा.. सर्वांत आधी गुजिया मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळा. त्यानंतर त्या बाहेर काढुन ठेवा. ५ ते १० मिनिटे त्या तशाच राहू द्या. त्यानंतर पुन्हा मध्यम आचेवर गडद सोनेरी-तपकिरी रंग येइपर्यंत तळून घ्या. असं केल्यामुळे पीठातला अतिरिक्त ओलावा निघून जातो आणि गुजियाचं कवच जास्त कुरकुरीत होतं.
(हेही वाचा – Farmers Protest : ७०० शेतकरी आंदोलकांना अटक; पंजाबमधील आप सरकारची आंदोलकांवर कारवाई)
योग्य तापमानावर तळून घ्या
तेलाच्या तापमानामुळे गुजिया कुरकुरीत किंवा नरम होऊ शकतात. गुजिया (gujiya) या कधीही जास्त तीव्र आचेवर तळू नका. कारण त्यामुळे बाहेरचं कवच लवकर तपकिरी होईल आणि आतला भाग कच्चा राहील.
याव्यतिरिक्त तुम्ही मंद आचेवर तळणे सुरू करून आणि नंतर मग हळूहळू शेगडीची आच मध्यम आणि तीव्र करू शकता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community